Ram Mandir Pran Pratistha
Ram Mandir Pran PratisthaEsakal

Ram Mandir Pran Pratistha: 'रामराज्यात असं झालं नसतं, रुग्णांचा जीव धोक्यात', एम्ससह रुग्णालयांच्या सुटीवर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Ram Mandir Pran Pratistha: अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली आहे. लोकांना कार्यक्रम पाहता यावा म्हणून अनेक राज्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Published on

केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या चार रुग्णालयांनी 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. AIIMS दिल्ली, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया आणि लेडी हार्डिंज हॉस्पिटलमध्ये OPD सेवा दुपारी 2.30 नंतर सुरू होईल. रुग्णालयातील सेवा बंद करण्याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे रुग्णांना त्रास होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

एम्स दिल्लीने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे की 22 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत संस्था बंद राहील. अशीच नोटीस राम मनोहर लोहिया हॉस्पिटलने जारी केली असून, त्यामध्ये नियमित सेवा आणि लॅब सेवा बंद ठेवण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. सफदरजंग हॉस्पिटल आणि लेडी हार्डिंगलाही तशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहेत.

Ram Mandir Pran Pratistha
PM Modi Ram Setu Visit: प्रभू रामाने जिथे ‘राम सेतू’ बांधला तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पूजा

प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल

नोटीसबाबत शिवसेना (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, 'मानवांनो नमस्कार. कृपया २२ तारखेला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत जाऊ नका. जायचं असेल तर २ वाजल्यानंतर जा. AIIMS दिल्ली मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे स्वागत करण्यासाठी वेळ काढत आहे. त्या पुढे म्हणाल्या, “प्रभू राम त्यांच्या स्वागतासाठी आरोग्य सेवा विस्कळीत केली जात आहे हे मान्य करतील का, याचे आश्चर्य वाटते. हे राम हे राम!"

Ram Mandir Pran Pratistha
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचं नवीन गाणं ऐकलं का?, कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे' फेमस भजन

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महमूद यांनीही रुग्णालयातील सुटीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, 'नरेंद्र मोदींना त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचे विनाव्यत्यय कव्हरेज हवे असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे, हे समजण्यापलीकडे आहे.' काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हणून आधीच वर्णन केले आहे. अयोध्येत बांधलेल्या अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन निवडणुकीच्या फायद्यासाठी होत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

Ram Mandir Pran Pratistha
Ram Mandir Pran Pratishta: प्राणप्रतिष्ठा विधी, आज रामलल्लाच्या मूर्तीला १०० हून अधिक कलशांच्या पाण्याने घालण्यात येणार स्नान

रामराज्यात रुग्णालये कधीच बंद होत नाहीत : कपिल सिब्बल

काँग्रेसचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनीही रुग्णालयांच्या ओपीडी सेवा बंद करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, 'एम्सने 22 जानेवारीला दुपारी 2.30 वाजेपर्यंत ओपीडी बंद ठेवली आहे. रामराज्यात असे कधीच होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com