Delhi Farmers Protest
Delhi Farmers Protest Esakal
देश

Delhi Farmers Protest: दिल्लीत पुन्हा शेतकरी मोर्चा; इंटरनेट बंद, हरयाणा-पंजाब बॉर्डर सील

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कूच केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी 'दिल्ली चलो'ची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. यामध्ये सुमारे २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.

किमान आधारभूत किंमतीसह इतर मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानं हा मोर्चा निघाला आहे. पण हरयाणातून निघालेल्या या शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी दिल्ली-हरयाणा बॉर्डर सील करण्यात आलीए. तर हरयाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीए. (Delhi Farmers Protest Internet cut off and sealed Haryana Punjab border)

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मझदूर मोर्चा यांनी 'दिल्ली चलो' ची हाक दिली आहे. यामध्ये सुमारे २०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर हरयाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथाल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा इथंली इंटरनेट सेवा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बंद केली आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर बल्क एमएमएस आणि सर्व प्रकारच्या डोंगल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये फक्त व्हॉईस कॉलची सेवाच सुरु राहणार आहे. ११ फेब्रुवारी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

त्याचबरोबर पंजाब, हरयाणा बॉर्डर अंबाला, जिंद आणिफतेहाबाद जिल्ह्यात बंद करण्यात आल्या आहेत. हरयाणा पोलिसांकडून इथं बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. इतर प्रवाशांना पोलिसांनी आवाहन केलं आहे की, त्यांनी चंदीगडून दिल्लीला जाण्यासाठी देराबास्सी, बरवाला/रामगड, सहा, शाहबाद, कुरुक्षेत्र, पंचकुला, कर्नाल आणि राष्ट्रीय महामार्ग ३४४ यमुनानगर पिपली असा प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT