Delhi Metro Fight Video Esakal
देश

Delhi Metro Fight Video: 'आता काय माझ्या डोक्यावर बसता का...',दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून पुन्हा गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

Delhi Metro Fight Video: हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 15.8 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक त्याला खूप लाइक आणि शेअर करत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Delhi Metro Fight Video: दिल्ली मेट्रोमध्ये जागांबाबत नेहमीच गोंधळ आणि भांडण सुरू असतात. त्याचे व्हिडिओही रोज समोर येतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सीटवरून दोन लोकांमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळते आहे. जवळच जास्त लोक उभे असलेले दिसतात. व्हिडिओमध्ये एक वृध्द व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो, 'माझ्या डोक्यावर बसता का' नंतर दोघेही या विषयावर तक्रार करण्याबाबत बोलतात. यावेळी लोक या दोघांची भांडणे मिटवण्याचाही प्रयत्न करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 15.8 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या व्हिडीओला खूप लाइक आणि शेअर करत आहेत. याव्हिडिओ वर कमेंट करत आहेत.

एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, 'दिल्ली मेट्रोमध्ये आजकाल मारामारी सामान्य झाली आहे! कोणी सीटसाठी भांडत आहे तर कोणी रील बनवून नाचत आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'एका जागेसाठी कशाला भांडण करता.' तिसरा यूजर म्हणतो, 'दिल्ली मेट्रोचे नाव बदलून केलेशी मेट्रो ठेवावे.'

याआधीही दिल्ली मेट्रोमधील मारामारीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. सहसा जागांवरून या मारामारी होतात. याशिवाय मेट्रोची रील बनवण्याचीही चर्चा आहे. लोक मेट्रोच्या आत नाचतात आणि रील बनवतात. त्यामुळे इतर प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT