Dark Parle-G: खरचं डार्क पारले-जी मार्केटमध्ये आला का? फोटो पाहून ग्राहकांची उत्सुकता वाढली, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Dark Parle-G: मार्केटमध्ये आता अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या दाखल झाल्या असल्या तरी पारले-जीचा दबदबा कायम आहे. पारले-जी हे भारताचे आवडते आणि खूप जुने बिस्किट आहे.
Dark Parle-G
Dark Parle-Gesakal

Dark Parle-G: अगदी अलिकडच्या काळापर्यंत लोकांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहा आणि पारलेजी बिस्किटाच्या पुड्याने व्हायची. सध्या अनेक व्हरायटी बिस्कीटात उतरल्या असल्या तरी बिस्किट म्हटल्यावर एक नाव समोर येते ते म्हणजे पार्ले-जी.

मार्केटमध्ये आता अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या दाखल झाल्या असल्या तरी पारले-जीचा दबदबा कायम आहे. पारले-जी हे भारताचे आवडते आणि खूप जुने बिस्किट आहे. ८५ वर्षांपूर्वी बाजारात आलेला चहासोबतचा हा लोकांचा आवडता नाश्ता आज देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँड पैकी एक आहे.

आता पारले-जी कंपनी नवीन फ्लेवरची बिस्किटं बाजारात आणत असल्याचं बोललं जात आहे. या 'डार्क पारले-जी'ची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक या बिस्किटावर मीम्स देखील बनवत आहेत.

एआय वापरून फोटो तयार केला असण्याची दाट शक्यता आहे. इंटरनेटवर ट्रेंड होत असलेल्या डार्क पारले-जी पॅकेटवर पारलेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, पारलेच्या वेबसाइटवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया हँडलवर डार्क पारले-जी बद्दल माहिती दिली नाही. मात्र  डार्क पारले-जी च्या फोटोमुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Dark Parle-G
Electoral Bond Case: मुदतवाढ मागणाऱ्या SBI विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका; कोर्टानं म्हटलं...

नेटकरी जोरदार मिम्स व्हायरल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहले,  “आजी खर सांगत होती की चहा पिनारे काळे होतात.” एकाने लिहले की, “चहाने पारले सोबत ब्रेकअप केल्यामुळे पारले गडद काळा झाला”.

हे खरे आहे का?-

एआय किंवा इतर काही साधनांचा वापर करून फोटो बनावट असल्याचे दिसले. मात्र, हे खरे आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी कोणतीही अधिकृत माहिती नाही. पार्लेने देखील आत्तापर्यंत या प्रतिमेवर काहीही भाष्य केलेले नाही.

Dark Parle-G
Varsha Gaikwad: काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय घडलंय वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com