Marriage sakal
देश

Marriage : सुशिक्षित तरूणाचा पराक्रम! एक नवरदेव अन् 2 नवऱ्या, त्याही सख्ख्या बहिणी

सकाळ डिजिटल टीम

जयपूर : राजस्थानातील जयपूर येथे एका तरूणाने दोन सख्खा बहिणीशी लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय ठरला असून या लग्नाची निमंत्रण पत्रिकासुद्धा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. या लग्नामध्ये नवऱ्या मुलाचे पाहुणे, मित्र आणि समाजातील मंडळी सहभागी झाले होते.

अधिक माहितीनुसार, राजस्थानातील उनियारा उपविभागातील मोरझालच्या झोपडिया गावातील ही घटना आहे. या गावातील हरिओम मीना या तरूणाला लग्नासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी निवई येथील सिद्रा गावात राहणाऱ्या बाबूलाल मीना यांची मोठी मुलगी कांता या तरूणीशी विवाह करण्यासंदर्भात पाहुणे मंडळींची बोलणी सुरू होती. हरिओम यांचे कुटुंबीय आणि पाहुणे मंडळी मुलगी पाहण्यासाठी गेले असता मुलगी असलेल्या कांता हिने मुलासमोर एक अट ठेवली.

मुलीने ठेवलेल्या अटीनुसार, कांता हिची लहान बहीण मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्यामुळे कांता हिला आपल्या लहान बहिणीला आयुष्यभर सांभाळायचं आहे. असं कांताने सांगितल्यावर हरिओम आणि त्याच्या कुटुंबियांनी ही अट मान्य केली आणि विवाहासाठीचा मार्ग मोकळा झाला. ५ मे रोजी हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

या लग्नाची निमंत्रणपत्रिका सुद्धा छापण्यात आली होती. यामध्ये सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. तर लग्नामध्ये दोघी सख्ख्या बहिणींनी हरिओम सोबत सात फेरे घेतले. हरिओमही सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत असून दोन्ही बायकांना सुखी ठेवणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT