Pune News : पोहण्याचा हट्ट बेतला जीवाशी; खडकवासला धरणात बुडालेल्या दोघींचे मृतदेह अखेर सापडले

बुडालेल्या इतर पाच जणींची प्रकृती सुधारली असल्याची माहिती आहे.
Pune Crime
Pune CrimeSakal
Updated on

सिंहगड : गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) येथे खडकवासला धरणात बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधण्यात पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. खुशी संजय खुर्दे (वय 13, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय 18, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) ही मृत मुलींची नावे आहेत.

दरम्यान, कुमुद संजय खुरदे (वय 10), पायल संतोष सावळे (वय 16, रा. राजीवनगर, सुरत, गुजरात), शितल अशोक धामणे (वय 17, रा. बोधवड जि. जळगाव.), राशी सुरेश मांडवे वय 9, रा.देऊळघाट , बुलढाणा), पल्लवी संजय लहाणे (वय 10, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा ) मिना संजय लहाणे (वय 32, रा. बोरगाव ता. चिखली, बुलढाणा) , राखी संजय लहाणे (वय 16, रा. बोरगाव ता चिखली, बुलढाणा) यांना वाचविण्यात यश आले आहे.

Pune Crime
Pune News : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्या; सात मुलींना वाचविण्यात यश

गोऱ्हे खुर्द येथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या संजय लहाणे यांच्या घरी मांडव परातणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी बुलढाणा व जळगाव येथून त्यांचे नातेवाईक आले होते. लहाणे खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सकाळी उठल्यानंतर मुलींनी पोहण्याचा हट्ट केला. सोबत आलेल्या वृद्ध महिलांनी मुलींना पाण्यात जाऊ नका असे सांगितले परंतु मुलींनी ऐकले नाही.

पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मिना संजय लहाणे यांच्यासह इतर सहा मुली पाण्यात बुडू लागल्या. काठावर बसलेल्या दोघींनी आरडाओरड केल्यानंतर सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले स्थानिक संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे व रमेश भामे हे मदतीसाठी धावले.

संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेऊन एक-एक करुन पाच जणींना पाण्याबाहेर काढले. राजेंद्र जोरी, कालिदास माताळे व इतरांनी बाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढून तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवालदार दिनेश कोळेकर व विलास प्रधान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज माळी, किशोर काळभोर, सुरज माने, योगेश मायनाळे व ओंकार इंगवले या जवानांनी बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले. हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Video Pune Khadakwasla Dam Releases 20779 Cusecs Mutha River Residents Asked to Stay Alert
Khadakwasla Dam Water Release Triggers Flood Alert in Pune 40 Families Evacuated from Ektanagar Safely
Khadakwasla Dam
Pune Dams Update Khadakwasla Dam Chain Holds 25.54 TMC Water Storage as Reservoir Levels Continue to Rise
Marathi News Esakal
www.esakal.com