Mizoram Assembly Election Counting Date Changes  
देश

Mizoram Counting Date Change: मिझोराम निकालाची तारीख बदलली, आता ३ डिसेंबरला नाही तर 'या' दिवशी होणार मतमोजणी

Sandip Kapde

Mizoram Assembly Election Counting Date Changes: पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर संपूर्ण देश 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मिझोराममधील निकालाची तारीख बदलली आहे. आता येथे 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

"कमिशनला 3 डिसेंबर, 2023 (रविवार) पासून मतमोजणीची तारीख बदलून इतर आठवड्याच्या दिवसात बदल करण्याची विनंती करणारे अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत, कारण 3 डिसेंबर 2023 हा रविवार मिझोरामच्या लोकांसाठी विशेष महत्त्व आहे," असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मतदानापूर्वीच मिझोराममध्ये मतमोजणीची तारीख बदलण्याची मागणी करण्यात आली होती. यावर सर्व पक्षांचे एकमत होते. रविवार हा ख्रिश्चनांसाठी पवित्र दिवस असल्याचे मागणी करणाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य असलेल्या मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलण्यात आली. (Latest Marathi News)

राजकीय पक्षांचे निवडणूक आयोगाला पत्र -

या मागणीबाबत सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले होते. या पत्रावर सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या अध्यक्षांच्या सह्याही होत्या. रविवारी मिझोराममध्ये कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित केला जात नाही, असे या पत्रात म्हटले आहे. 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT