New York City: जेव्हा 'न्यूयॉर्क सीटी'पर्यंत पोहोचतो योगी सरकारचा बुलडोझर! एकच खळबळ; काय घडलंय जाणून घ्या

गुरुवारी पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on

लखनऊ : योगी सरकारनं न्यूयॉर्क सीटीवर बुलडोझर चालवल्यानं खळबळ उडाली आहे. लखनऊ विकास प्राधिकरणानं (एलडीए) गुरुवारी ही कारवाई केली. शहराच्या बाहेर काकोरी भागातील मौदा गावात 'न्यूयॉर्क सिटी' नामक एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. सुमारे ४५ एकरांवर प्रकल्प उभा राहणार होता. (When Yogi government bulldozer reaches New York City need to know what exactly happened)

Yogi Adityanath
Manoj Jarange: "जरांगे कोण ओळखत नाही" म्हणणाऱ्या राणेंवर जरांगेंचा 'प्रहार'; म्हणाले, आमचेच लोक...

मीडियातील वृत्तानुसार, एलडीएके झोनल अधिकारी देवांश त्रिवेदी यांनी म्हटलं की, ही कॉलनी एलडीएच्या लेआऊटच्या परवानगीनं उभारली जात होती. याप्रकरणी एलडीएनं डेव्हलपर्सला इशारा दिल होता. पण त्यांनी परवानगीशिवाय पुन्हा काम सुरु केलं. त्यामुळं एलडीए कोर्टानं ही कॉलनी पाडण्याचे आदेश दिले. (Marathi Tajya Batmya)

Yogi Adityanath
COP28 : आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा

कोर्टाच्या आदेशानंतर गुरुवारी असिस्टंट इंजिनिअर वायपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली एलडीएच्या टीमनं पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझर चालवत बांधकाम सुरु असलेली इमारत जमीनदोस्त केली. इतकेच नाहीतर या भागातील एका ओपन रेस्तराँला देखील एलडीएनं टाळं लावलं. ते देखील विनापरवाना सुरु होतं. याशिवाय आलमबाग, काकोरी आणि कृष्णानगर भागातील इतर पाच बेकायदा बांधकामं देखील सील करण्यात आली आहेत. (Latest Marathi News)

Yogi Adityanath
होत्याचं नव्हतं! MBBSची डिग्री घेऊन 'तो' आनंदानं निघाला अन् रस्त्यात सापानं...

यापूर्वी कुठे झाल्यात कारवाया

ऑक्टोबर २०२३ मध्ये योजी सरकारनं फारुखाबादमध्ये गँगस्टर आणि बसपा नेता अनुपम दुबे यांचं बहुमजली हॉटेल उद्ध्वस्त केलं होतं. मीडिया वृत्तानुसार, बेकायदा कब्जा करण्यात आलेल्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या या हॉटेलची किंमत २० कोटी रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com