Election Result Esakal
देश

Narottam Mishra Defeat: "गड आला पण सिंह गेला.." केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे ३ खासदार पराभूत; कोण आहेत ते?

केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांचा धक्कादायक पराभव

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर राजस्थानमध्ये भाजपच्या दोन खासदारांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून पराभव पत्करावा लागला आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपने केंद्रातील काही मंत्री व खासदारांना मैदानात उतरविले होते. बहुतेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतही यश संपादन केले आहे. परंतु काहींना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते प्रमुख आहेत. ते मध्य प्रदेशातील निवास या मतदारसंघातून निवडणूक लढवित होते. त्यांना काँग्रेसचे चैनसिंह वरकडे यांनी पराभूत केले आहे.

त्याचप्रमाणे राजस्थानमधील भाजपचे दोन खासदार देवजी पटेल व खासदार भगिरथ चौधरी पराभूत झाले आहे. खासदार देवजी पटेल सांचोर या मतदारसंघातून निवडणूक लढवित होते. या मतदारसंघातून भाजपचे बंडखोर जीवाराम चौधरी विजय झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सुखराम विश्नोई राहिले. खासदार देवजी पटेल यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली आहे. त्याचप्रमाणे किशनगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार खासदार भागिरथ चौधरी होते. त्यांना काँग्रेसचे विकास चौधरी यांनी पराभूत केले. या मतदारसंघातही भागिरथ चौधरी यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली.मंडावातून खासदार नरेंद्रकुमार हे पराभूत झाले आहेत.

नरोत्तम मिश्रा पराभूत

मध्य प्रदेशचे वादग्रस्त गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतिया मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. परंतु काँग्रेसचे भारती राजेंद्र यांनी त्यांचा पराभव केला.

‘हे’ खासदार विजयी

मध्य प्रदेशातून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे दिमानी (मध्य प्रदेश), केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (नरसिंगपूर), कैलाश विजयवर्गीय (इंदूर एक), खा. रीती पाठक (सिधी), खा.उदयप्रतापसिंह (गदरवारा), खा.राकेशसिंह (जबलपूर पश्चिम) हे मंत्री व खासदार विजयी झाले आहेत. तर राजस्थानातून खा. राज्यवर्धन राठोड (झोटवाड), खा. बाबा बालकनाथ (तिजारा), किरोडीलाल मीना (सवाई माधोपूर), खा. दीयाकुमारी (विद्याधरनगर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT