Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी

राजस्थानचा अंतिम निकाल

  • भाजप- ११५

  • काँग्रेस- ६९

  • भा.आदिवासी पा.-३

  • बीएसपी- २

  • राष्ट्रीय लोक दल- १

  • रा. लोकतांत्रिक पा.- १

  • अपक्ष - ८

  • एकूण- १९९

दिल्ली हायकमांडच्या बैठकीत ठरणार राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री

राजस्थानमध्ये नियम बदलण्याची परंपरा कायम राहिली. मतमोजणीत भाजप स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच्या मतमोजणीत राजस्थानमध्ये भाजप 115 जागांवर पुढं आहे. यापैकी भाजपनं 102 जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला 42 जागांची वाढ झाली आहे. अशोक गेहलोत यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. आता दिल्लीत होणाऱ्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणार आहे.

काँग्रेसच्या पराभवानंतर अशोक गेहलोतांनी राज्यपालांकडं सुपूर्द केला राजीनामा

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेहलोत रविवारी संध्याकाळी राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राजभवनच्या निवेदनानुसार, राज्यपाल मिश्रा यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा स्वीकारला आणि राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्याचे आवाहन केले.

Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात काँग्रेसचा दारुण पराभव; मुख्यमंत्री गेहलोतांनी राज्यपालांकडं राजीनामा केला सुपूर्द

मायावतींच्या बसपाने राजस्थान निवडणुकीत दोन जागांवर मारली बाजी

राजस्थान निवडणुकीत बसपाने दोन जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मायावतींच्या बसपाने बारी आणि सादुलपूर या जागा जिंकल्या आहेत. बारीमधून बसपाचे जसवंत सिंग गुर्जर विजयी झाले आहेत, तर सादुलपूरमधून बसपाचे मनोज कुमार विजयी झाले आहेत.

जयपूरमध्ये सर्व आमदारांची होणार बैठक

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सोमवारी आजोजित केलेली बैठक मंगळवारी होणार आहे. मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. 

प्रचंड मेहनत करूनही आम्हाला यश मिळालं नाही - अशोक गेहलोत

राजस्थानच्या जनतेनं दिलेला जनादेश आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याचा स्वीकार केलाय. आमच्यासाठी हा अनपेक्षित निकाल होता. आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले. मात्र आम्ही यशस्वी झालो नाही. नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा. माझा त्यांना सल्ला आहे की, खूप मेहनत करूनही आम्हाला यश मिळालं नाही, याचा अर्थ त्यांनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांना आमच्यापेक्षाही जास्त काम करावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिली.

Rajasthan Election Voting: राजस्थानमधील १०७ जागांचे निकाल आले समोर; भाजपचे अर्धशतक पुर्ण

राजस्थानमधील १०७ जागांचे निकाल आले समोर आले आहेत.

भाजप- ६५

काँग्रेस- ३६

भारत आदिवासी पार्टी- २

बहुजन समाज पार्टी- २

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी- ०

राष्ट्रीय लोक दल- ०

अपक्ष- ३

Voting Booth Violence Rajasthan elections: शाहजहांपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

राजस्थानच्या शाहजहांपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Rajasthan Election Voting: विद्याधर नगर येथील उमेदवार दिया कुमारी विजयी

भाजप खासदार आणि विद्याधर नगर येथील उमेदवार दिया कुमारी यांनी एकूण 1,58,516 मते मिळवून 71,368 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानमध्ये 23 जागांवर भाजपचे वर्चस्व; तर काँग्रेस ११ जागांवर 

राजस्थानमध्ये ३७ जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे, तर काँग्रेस ११ जागांवर विजयी झाले आहे. भारत आदिवासी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष प्रत्येकी एक जागांवर विजयी झाले आहेत.

Rajasthan Assembly Election 2023 Results: राजस्थानमधील पक्षाच्या आघाडीवर भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया म्हणाल्या, 'हा विजय...'

राजस्थानमधील पक्षाच्या आघाडीवर भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, "हा विजय पीएम मोदींनी दिलेल्या 'सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रवास' या मंत्राचा आहे. हा पंतप्रधानांनी दिलेल्या हमीचा विजय आहे. अमित शहा यांनी दिलेल्या रणनीतीचा आणि नड्डाजींनी दिलेल्या सक्षम नेतृत्वाचाही विजय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे."

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE : झालरापाटनमधून माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या उमेदवार वसुंधरा राजे विजयी

झालरापाटनमधून माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या उमेदवार वसुंधरा राजे 53,193 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत त्यांना एकूण 1,38,831 मते मिळाली आहेत.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE : राजस्थानमध्ये 24 जागांवर भाजप विजयी; काँग्रेस ५ जागांवर

राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. भाजप २४ जागांवर तर काँग्रेस ५ जागांवर आहे. तर भारत आदिवासी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष प्रत्येकी एक जागांवर विजयी झाले आहेत.

काँग्रेसने पराभव स्वीकारला, गेहलोत 5.30 वाजता राज्यपालांकडे सादर करतील राजीनामा

राजस्थान काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज सायंकाळी साडेपाच वाजता राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. सांगानेर विधानसभेतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भजनलाल शर्मा ५० हजार मतांनी विजयी झाले.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE : राजस्थानमध्ये ९ जागांवर भाजप विजयी; काँग्रेस २ तर भारत आदिवासी पार्टी १ वर

राजस्थानमध्ये ९ जागांवर भाजप विजयी झाले आहे. काँग्रेस २ तर भारत आदिवासी पार्टी १ वरती आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE : राजस्थानमध्ये ५ जागांवर भाजप विजयी तर प्रत्येकी एक एक जागांवर काँग्रेस अन् भारत आदिवासी पार्टी

राजस्थानमध्ये आत्तापर्यंत ७ जागांचे निकाल हाती आले आहेत. ५ जागांवर भाजप विजयी तर प्रत्येकी एक एक जागांवर काँग्रेस आणि भारत आदिवासी पार्टी विजयी झाले आहेत.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानमधील निकाल येण्यास सुरूवात

राजस्थानमधील निकाल येण्यास सुरूवात झाली आहे.राजस्थानमधील ३ जागांचे निकाल आत्तापर्यंत हाती आले आहेत. त्यापैकी २ जागा भाजपने जिंकल्या आहेत तर १ जागा भारत आदिवासी पार्टीने जिंकली आहे.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे प्रचंड मतांनी विजयी

झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे 103010 मतांनी विजयी झाल्या. 2003 पासून त्या या जागेवरून विजयी होत आहेत. 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मते मिळवली.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: सचिन पायलटांकडं दुर्लक्ष करणं काँग्रेसला पडलं महागात

गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड राजस्थान विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. इथं काँग्रेस सत्तेपासून कोसो दूर असल्याचं ट्रेंडवरून स्पष्ट झालंय. संपूर्ण राज्यातील काँग्रेस आणि भाजपच्या यशस्वी उमेदवारांचा आलेख पाहिला तर सर्वप्रथम लक्षात येतं ते म्हणजे, काँग्रेसबाबत विश्लेषक ज्या भीतीचं भाकीत करत होते, तेच घडलं आहे. सचिन पायलटांकडं दुर्लक्ष करणं काँग्रेसला चांगलंच महागात पडलं आहे. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानात सत्ताबदलाची परंपरा कायम; भाजप आघाडीवर

राजस्थानात मतदारांनी सत्ताबदलाची परंपरा कायम ठेवली आहे. समोर आलेल्या कलांनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे. तर राजस्थानमधील प्रमुख नेत्यांपैकी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, वसुंधरा राजे आघाडीवर आहेत.

Rajasthan Election Voting: टोंकमध्ये सचिन पायलट १९ हजार १६५ मतांनी पुढे आहेत

टोंकमध्ये सचिन पायलट १९ हजार १६५ मतांनी पुढे आहेत. मतमोजणीची 13वी फेरी पूर्ण झाली आहे. टोंक जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार दोन जागांवर तर भाजपचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गुढा पिछाडीवर; भाजपचे उमेदवार शुभकरन चौधरी 9000 मतांनी पुढे

उदयपुरवाटी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शुभकरन चौधरी ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी काँग्रेसमधून बडतर्फ झालेले नेते आणि आता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गुढा दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Rajasthan assembly elections Result LIVE: प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला 10 फेऱ्यांमध्ये 10 हजार मतेही मिळाली नाहीत. भाजपविरोधात बंडखोरी करणाऱ्या चंद्रभान सिंग आक्याचा आकडा 50 हजारांवर पोहोचणार आहे.

अपक्ष चंद्रभान सिंग आक्या : 47508

काँग्रेसचे सुरेंद्र सिंह जाधवत : 43194

भाजपचे नरपत सिंग राजवी : 9192

Rajasthan assembly elections news: जयपूरमधील भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू

निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, राजस्थानमध्ये भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू केला आहे.

Rajasthan assembly elections Result LIVE: राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी; वसुंधरा राजे २३ हजार मतांनी आघाडीवर

राजस्थानमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. वसुंधरा राजे २३ हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपने बहुमताचा मोठा अकडा गाठला आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: सचिन पायलट आघाडीवर; भाजप 124 वर आणि काँग्रेस 61 वर

मतमोजणीच्या चौथ्या फेरीतही सचिन पायलट आघाडीवर आहे. टोंकचे आमदार 2822 मतांनी आघाडीवर आहेत.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानात भाजप विजयाच्या वाटेवर; मुख्यमंत्री पद कोणाला?

राजस्थानात भाजप विजयाच्या वाटेवर दिसत आहे. भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाला? मिळणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

जयपूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी लाल डायरीचा केला उल्लेख

राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी निवडणूक निकालांच्या मतमोजणीच्या वेळी काँग्रेसच्या लाल डायरीचा उल्लेख केला आहे. नरेंद्र मोदींवर देशातील जनतेचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव हा लाल डायरीचा प्रभाव आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानमध्ये भाजपने गाठला मोठा आकडा; काँग्रेसच्या तुलनेत दुपट्ट जागा

राजस्थानमध्ये भाजपने मोठा आकडा गाठला आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपने दुपट्ट जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजप आता १२५, काँग्रेस ६२ तर अपक्ष १२ जागांवर दिसून येत आहे.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानमध्ये भाजपची मुंसडी; भाजप ११५, तर काँग्रेस ७२ जागांवर

राजस्थानमध्ये भाजपने मुंसडी मारली आहे. भाजप ११५, तर काँग्रेस ७२ जागांवर दिसून येत आहे.

Rajasthan Assembly Election: सचिन पायलट पुन्हा आघाडीवर; भाजप १०५, काँग्रेस ८० तर इतर १४ जागांवर 

सचिन पायलट पुन्हा आघाडीवर दिसून येत आहेत. भाजप १०५, काँग्रेस ८० तर इतर १४ जागांवर आहेत. (Rajasthan election results in Marathi)

Rajasthan assembly elections 2023: राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का? टोंकमधून सचिन पायलट पिछाडीवर

 राजस्थानमध्ये टोंकमधून सचिन पायलट पिछाडीवर दिसून येत आहेत. तर राजस्थानच्या झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या फायरब्रँड नेत्या वसुंधरा राजे ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानचे सर्व कल आले समोर; भाजप १००, काँग्रेस ८० तर इतर १९ जागांवर 

राजस्थानचे सर्व कल समोर आले आहेत. यानुसार भाजप १००, काँग्रेस ८० तर इतर १९ जागांवर आहे.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: भाजपची ९० जागांवर आघाडी; काँग्रेस ७० जागांवर

भाजपची ९० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजपला मोठं यश दिसून येत आहे.

Rajasthan Assembly Election live update: राजस्थानमध्ये भाजप ७६ जागांवर आघाडीवर; तर काँग्रेस ६१ जागांवर 

राजस्थानमध्ये भाजप ७६ जागांवर आघाडीवर दिसून येत आहे. तर काँग्रेस ६१ जागांवर आहे.  

Rajasthan Assembly Election Voting: टोंकमधून सचिन पायलट आघाडीवर

टोंकमधून सचिन पायलट आघाडीवर आहेत. तर वसुंधरा राजे यांनी झालरापाटनमधून आघाडी घेतली आहे.

टोंक - सचिन पायलट (काँग्रेस) - आघाडीवर

झालरापाटन - वसुंधरा राजे (भाजप) - आघाडीवर

झोटवाडा - राज्यवर्धन राठोड (भाजप) - आघाडीवर

Rajasthan Assembly Election live update: भाजप ५३ जागांवर आघाडीवर; तर काँग्रेसने पुर्ण केलं अर्धशतक

भाजपची ५३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रसने अर्धशतक पुर्ण केलं आहे. तर इतर १४ जागांनी आघाडीवर आहे.

Rajasthan elections Result LIVE: भाजपचं अर्धशतक पुर्ण; काँग्रेसचीही घौडदौड सुरू

राजस्थानमध्ये आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजपने अर्धशतक पुर्ण केलं आहे. तर काँग्रेसचीही घौडदौड सुरू आहे.

Rajasthan elections Result LIVE: सरदारपूरामधून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर

सरदारपूरामधून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये आत्तापर्यंतच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानमध्ये भाजपची ४६ जागांवर आघाडीवर

समोर आलेल्या राजस्थानमध्ये भाजपची ४६ जागांवर आघाडी आहे, तर काँग्रेस ३५ जागांवर पिछाडीवर आहे. तर इतर ७ जागांवर आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत गोविंद देवजी मंदिरात

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज सकाळी मतमोजणीच्या दिवशी जयपूरच्या गोविंद देवजी मंदिरात प्रार्थना केली.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: मतमोजणीला सुरूवात; उमेदवारांची धाकधुक वाढली

राजस्थानमध्ये मजमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणी केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलच्या निकालानुसार राजस्थानमधील दरसाल सत्ता बदलण्याची प्रथा बदलू शकते. Axis My India च्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसची सत्ता कायम राहू शकते. काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळू शकतात. तर भाजपला 80 ते 100 जागा मिळू शकतात. भाजपला ४१ टक्के मतं मिळू शकतात, तर काँग्रेसला ४२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 15 टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोणाला?

एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार राहिले आहेत, आज तक टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये 32 टक्के लोकांनी त्यांची निवड केली होती. तर 21 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, भाजपमधील कोणीही गेहलोत यांच्यापेक्षा चांगला मुख्यमंत्री असेल. या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, देवजी पटेल, दिया कुमारी, गौरव वल्लभ आदी नेत्यांनी निवडणूक लढवली होती. .

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: राजस्थानची दरवर्षी सरकार बदलण्याची परंपरा

राजस्थानची दरवर्षी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मात्र, सत्ताबदलाची ही परंपरा काँग्रेस बदलताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, राज्यात दोन्ही पक्षांमध्ये कांटे की टक्कर असली तरी आकडेवारीत काँग्रेस थोडी पुढे आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: या मुद्द्यांनी प्रचारात गाजवलं वर्चस्व

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री चेहरा जाहीर न करता निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सत्ताधारी पक्षाने 'काम किया है दिल से, कांग्रेस फिर से' असा नारा देत निवडणूक लढवली, तर भाजपने 'मोदी साथे राजस्थान' असा नारा दिला होता. चिरंजीवी योजना, स्वस्त गॅस सिलिंडर यांसारख्या योजनांबाबत काँग्रेस जनतेत गेली, तर भाजपने कन्हैयालाल हत्या, जोधपूर दंगल आणि पेपरफुटीच्या घटनांना मुद्दा बनवले.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: काँग्रेस की भाजप? राजस्थानमधील जनता कोणाच्या पारड्यात टाकणार सत्ता

राज्यात गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी सत्ता बदलते. राज्यातील सत्ता बदलणार की, राजस्थानची जनता पुन्हा काँग्रेसलाच संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE

राजस्थानमध्ये (Rajasthan) (शनिवारी) म्हणजेच, 25 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या 199 जागांसाठी मतदान पार पडलं. काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या निधनामुळं करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलण्यात आली आहे.विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात आहे, त्यांचं भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदारांनी मतदान पेटीत बंद केलं आहे. राज्यात गेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी सत्ता बदलते.

सालाबादप्रमाणे राज्यातील सत्ता बदलणार की, राजस्थानची (Rajasthan) जनता पुन्हा काँग्रेसलाच(Congress) संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला 100 ते 110 आणि काँग्रेसला(Congress) 90 ते 100 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अपक्ष यांना 5 ते 10 जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध काँग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.