Mohan Bhagwat Esakal
देश

Mohan Bhagwat: भारतातील प्रत्येक व्यक्तीचा DNA एकच, तो म्हणजे हिंदू; मोहन भागवतांचं मोठं विधान

आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारे देवांची पूजा, भक्ती केली जाते

सकाळ डिजिटल टीम

सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लोकांच्या सर्वधर्मीय लोकांच्या एकत्र राहण्यावर आणि डीएनए संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए हिंदूच असल्याचे मोहन भागवत म्हणालेत. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारे देवांची पूजा, भक्ती केली जाते. ती कुणी बदलण्याची गरज नाहीये. कारण कोणत्याही माध्यमातून केलेली प्रार्थना एकाच ठिकाणी जाऊन पोहचते, असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

पुढे बोलताना ते म्हणाले की, जवळजवळ 40 हजार वर्षांआधीपासून अखंड भारताचा डीएनए एकच आहे. तर काबूलच्या पश्चिमेपासून ते छिन्दविन नदीच्या पूर्वेपर्यंत तिबेटच्या उत्तरेपासून म्हणजेच चीनपासून ते श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंतच्या प्रदेशात जे लोक राहत आहेत त्या सर्व लोकांचा डीएनए 40 हजार वर्षांपासून एकच आहे. तेव्हापासून आपले पूर्वज एकसमान आहेत.भारतात राहणाऱ्याचा डीएनए एकच आहे. तो म्हणजे हिंदू, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

छत्तीसगड येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात हे बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT