
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, “आम्ही ब्राह्मण आहोत याचा आम्हाला गर्व आहे”. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर सोशल मीडियावर या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. अमृता फडणवीस काल (सोमवारी) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
अमृता फडणवीस बोलताना म्हणाल्या की, आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचाही आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यातली कमतरता नाही, पण आम्ही असं करतही नाही. आमचं तसंच दिसून येतं असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
हे सर्व बोलतानाच अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, आमची महानताही न दाखवता तशीच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीच हे पद मागितलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.