Bajrang da 
देश

फेसबुक इंडियाचे प्रमुख म्हणतात, बजरंग दलाला FB वर बंदी घालण्याची गरज नाही

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी बुधवारी संसदेच्या एका समितीला सांगितलं की फेसबुकच्या सत्यशोधन समितीला बजरंग दलाबाबत अशी कोणतीही आक्षेपार्ह बाब मिळाली नाही ज्या आधारावर बजरंग दलावर फेसबुकवर बंदी लावण्याची आवश्यकता दिसून येईल. माहिती तंत्रज्ञानाच्या संसदीय स्थायी समितीने अजित मोहन यांना युझर्सच्या माहितीच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले होते.

हेही वाचा - कोण होते संत बाबा राम सिंह? शेतकरी आंदोलनात गोळी झाडून केलीय आत्महत्या
सुत्रांनी सांगितलं की, कार्ती चिदंबरम यांनी मोहन यांना बजरंग दलावर बंदीबाबत असलेली वॉल स्ट्रीट जर्नलची अलिकडच्या एका रिपोर्टचा हवाला देऊन प्रश्न विचारले. समितीच्या सदस्यांच्या प्रश्वावर मोहन यांनी म्हटलं की फेसबुकच्या सत्याशोधन समितीला आतापर्यंत तरी कोणतेही आक्षेपार्ह आणि फेसबुकच्या धोरणांचे उल्लंघन करेल असा मजकूर आढळून आलेला नाहीये. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय की बजरंग दलावर बंदीसंदर्भातील मूल्यांकनानंतरही फेसबुकने आपल्या आर्थिक कारणांमुळे तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी कोणतीही कारवाई करण्याचे धाडस केलं नाहीये.

वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या रिपोर्टमध्ये बजरंग दलाने पोस्ट केलेल्या व्हिडीओचा हवाला दिला होता. यामध्ये बजरंग दलाने दिल्लीबाहेरील चर्चवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या व्हिडीओला जवळपास 2.5 लाख व्ह्यूज होते. भारतात सत्ताधारी असणाऱ्या हिंदू राष्ट्रवादी नेत्यांना त्रास देण्याबरोबरच बजरंग दलावर बंदी घालण्याने भारतातील फेसबुक धोक्यात येऊ शकते. तसेच कर्मचाऱ्यांवर शारीरिक हल्ले होऊ शकतात, असे जर्नलने एका अंतर्गत अहवालाचा हवाला देऊन म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT