ओवेसींचे ‘मिशन यूपी’सुरू;शिवपाल यादव यांनाही भेटणार 

MIM president Asaduddin Owaisi mission UP
MIM president Asaduddin Owaisi mission UP

लखनौ - बिहारच्या राजकीय रणांगणामध्ये यशस्वीरीत्या पाय रोवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता उत्तरप्रदेशावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. ओवेसी यांनी आज लखनौमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते आणि कधीकाळी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेल्या ओमप्रकाश राजभर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. भाजपवर निशाणा साधताना ओवेसी यांनी मी येथे नावे बदलण्यासाठी नाही तर मने जिंकण्यासाठी येथे आलो आहे असे सूचक वक्तव्य केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ओेवेसी त्यांच्या या दौऱ्यामध्ये प्रगतिशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये २०२२ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी आतापासूनच मित्रपक्षांच्या सहकार्याने रणनीती आखायला सुरवात केली आहे. तत्पूर्वी आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उत्तरप्रदेशात विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मायावतींची नजर एमआयएमवर 
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या ओवेसी यांच्यासोबत हातमिळवणी करून दलित मुस्लिम कार्ड खेळण्याच्या विचारात आहेत. बिहारमध्ये एमआयएमला मिळालेले राजकीय यश लक्षात घेऊन मायावती यांनी आता नव्या मित्राला जोडण्यासाठी कंबर कसली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com