farmer protest 1.jpg 
देश

कडाक्याच्या थंडीतही आंदोलनावर शेतकरी ठाम, दिल्लीची वाहतूक कोंडी करण्याचा दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी उत्तर दिल्लीतील बुराडी मैदानावर गेल्यानंतर चर्चा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अमान्य केला आहे. कोणत्याही अटीवर चर्चा करण्यास तयार नसल्याचे आंदोलक शेतकऱयांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत जाण्यासाठीचे सर्व पाच मार्ग बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

शेतकऱ्यांनी रविवारपर्यंत फक्त सिंघू सीमा आणि टिकरी सीमा बंद केली होती. आता त्यांनी गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरिदाबाद येथून राजधानीला जोडणारे महामार्ग बंद करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मध्यरात्री उशिरापर्यंत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. ही बैठक सुमारे दोन तास चालली. 

अमित शहांचा प्रस्ताव फेटाळला
गृहमंत्रालयानेही शेतकरी संघटनांना केंद्रीय मंत्र्यांचे एक उच्चस्तरीय पथक आंदोलक बुराडी मैदानात पोहोचल्यानंतर चर्चा करेल असे आश्वासन दिले होते. परंतु, शेतकरी संघटनांच्या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. कडाक्याच्या थंडीतही सिंघू सीमा आणि टिकरी सीमेवरच आंदोलन करण्यावर ठाम राहिले. आंदोलनस्थळ बदलण्याची सरकारची अट शेतकऱ्यांनी मान्य केली नाही. आंदोलकांनी बुराडी मैदान हे एक 'खुले कारागृह' असल्याचे म्हटले. 

दुसरीकडे, शनिवारी बुराडी येथे निरंकारी समागम मैदानावर गेलेल्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन कायम ठेवले. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी 32 शेतकरी संघटनांना थंडी आणि कोरोनाच्या परिस्थितीचा हवाला देत शेतकऱ्यांनी बुराडी मैदानात जाण्याचा दिलेला सल्ला आंदोलकांनी फेटाळला. शेतकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा बुराडी मैदानावर करण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तरीही आंदोलक शेतकऱ्यांनी हे मान्य केले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune PMP Bus Service: घराबाहेर पडताच पाच मिनिटांत बस; पीएमपीचे ‘ट्रिपल फाइव्ह’ मॉडेल, वर्षअखेर १७१५ नवीन बस दाखल होणार

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

Fertilizer Price Hike: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा धक्का; खतांचे दर २०० ते ६०० रुपयांनी वाढले, शेतीचा खर्च गगनाला

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

SCROLL FOR NEXT