भारतीय जनता पक्षाचा उर्दूत जाहीरनामा

वृत्तसंस्था
Monday, 30 November 2020

जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास मंडळाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने उर्दू भाषेत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ३७० आणि ३५ अ ही कलमे रद्द करण्यात आल्यामुळे देश एकसंध झाल्याचा दावा यात करण्यात आला असून विकास आणि शांततेचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही घडामोड घडल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात निवडणूकांच्या रुपाने प्रथमच राजकीय घडामोड घडत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास मंडळाच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने उर्दू भाषेत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ३७० आणि ३५ अ ही कलमे रद्द करण्यात आल्यामुळे देश एकसंध झाल्याचा दावा यात करण्यात आला असून विकास आणि शांततेचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही घडामोड घडल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात निवडणूकांच्या रुपाने प्रथमच राजकीय घडामोड घडत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विधानपरिषदेचे माजी सदस्य विभोद गुप्ता यांनी सोफी युसूफ आणि दाराखशान अब्दारबी अशा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी असे विरोधी पक्ष राष्ट्रहिताच्या विरोधात आणि मतांसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा विकास मंडळ ही स्थानिक पातळीवरील संस्था असल्यामुळे या निवडणूकीला महत्त्व आहे. या निवडणूका प्रथमच होत असून आठ टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवार झाले.

कोविशिल्ड लशीचे एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम? सीरमने केला खुलासा

 

भाजपचे मुद्दे

  • फेररचनेमुळे जम्मू-काश्मीरची विकास आणि शांततेच्या मार्गावर वाटचाल
  • दगडफेकीचे प्रकार थांबले
  • दहशतवादाविरुद्ध पोलादी प्रत्युत्तर
  • केंद्रशासित प्रदेशातील सरकारी नोकऱ्यांत स्थानिकांना शंभर टक्के आरक्षण
  • औद्योगिकरणाला चालना देणारे धोरण
  • भ्रष्टाचार आणि जमिनी बळकावण्याविरुद्ध लढाई छेडली
  • वीज, पाणीपुरवठा, रस्त्यांचे जाळे यांतही सुधारणा

निजाम संस्कृतीतून हैदराबादला मुक्त करू- अमित शहा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Partys Urdu Manifesto