navjyot singh siddhu 
देश

जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले 21 दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज 22 वा दिवस आहे. या दरम्यानच काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर कठोर टीका केलीय. त्यांनी मोदी सरकारला कॉर्पोरेटधार्जिणं सरकार म्हटलं आहे. तसेच जो कुणी मोदी सरकारला विरोध करेल त्याला थेट देशद्रोही म्हटलं जातंय. ही आपल्या भारतीय संविधानाची लढाई आहे. हे देशाचे जाती-धर्माच्या नावावर विभाजन करु इच्छित आहेत, असंही नवज्योत सिंह सिद्धू यांनी म्हटलं आहे.

या वक्तव्याचा व्हिडीओ नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, मोदी सरकारने सगळे फायदे केवळ धनदांडग्यांसाठी केले आहेत. देशातल्या सरकारी कंपन्या संपवण्यात आल्या आहेत. बीएसएनएलचं उदाहरण घ्या. मी आतापर्यंत असा पंतप्रधान बघितलेला नाहीये जो जिओ धन धना धन सोबत जाहिरात करतोय. दुसरीकडे बीएसएनएल या सरकारी कंपनीला वार्षिक आठ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय. जिओ एका वर्षात 900 कोटी रुपये कमावत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे सिद्धू यांनी म्हटलंय की, ओएनजीसी या सरकारी कंपनीकडे एक लाख कोटी रुपयांचा अधिक निधी उपलब्ध होता. रिलायन्सने ओएनजीसीकडून 11 हजार कोटी रुपयांचे तेल चोरलं आहे. शाह कमिटी बनली. याबाबतीत सुप्रीम कोर्टाने रिलायन्सने ओएनजीसीचे 11 हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. ते पैसे आजपर्यंत परत मिळालेले नाहीयत, असंही सिद्धू यांनी म्हटलंय.

मनमोहन सिंह सरकारने शेतकऱ्यांचं 72 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं होतं. आपण दावा केला होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार. ते दुप्पट झालं का? मात्र दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या वर्षी धनदांडग्यांचे साडेतीन लाख कोटींचं कर्ज माफ केलं. खासगी विमान कंपन्यांनी सरकारी विमान कंपन्यांची जागा घेतलेली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठी लूट केली जातीय. पीक खराब झालं तर शेतकऱ्यांना त्याचा परतावाही कमी किंमतीचा दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचीच नव्हे तर सरकारी खजान्याचीही  लूट होत आहे. अशीही टीका नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT