6 February 
देश

पोलिसांचे सिंघू बॉर्डरवर DJ लावून 'संदेसे आते है'; शेतकऱ्यांची गाणं बंद करण्याची मागणी

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्दबातल करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांचा उत्साह वाढवण्यासाठी सिंघू बॉर्डरवर ठिकठिकाणी डीजे लावण्यात आले आहेत.

तसेच या डीजेवर बॉर्डर चित्रपटातील गाणं 'संदेसे आते है' हे लावण्यात येत आहे.  मात्र, शेतकरी आंदोलकांनी सातत्याने हा डीजे बंद करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, या डीजेमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किसान मजदूर संघर्ष समितीद्वारे काढण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये हा डीजे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

राजधानी दिल्लीमध्ये 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर आंदोलन गुंडाळलं जाईल की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपला निर्धार पक्का करत या आंदोलनावर पकड मिळवली आहे. यानंतर मोठ्या संख्येने लोक आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून सध्या बॉर्डर्सवर मोठमोठाले बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. तसेच टोकदार असे खिळे रस्त्यावर ठोकण्यात आले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना अडवता येईल. तसेच या भागातील इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT