Shalmala River in Sirsi Karwar esakal
देश

Shalmala River : सहलीवर आलेल्या कुटुंबाचा दुःखद शेवट! पाच जणांचा शाल्मला नदीत बुडून दुर्दैवी अंत

शाल्मला नदीत (Shalmala River) रविवारी पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कौटुंबिक सहलीवर आलेल्यांचा दुःखद शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बंगळूर : कारवार जिल्ह्यातील शिर्सीजवळील (Karwar Sirsi) शाल्मला नदीत (Shalmala River) रविवारी पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कौटुंबिक सहलीवर आलेल्यांचा दुःखद शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सलीम (वय ४४), उमर सिद्दीकी (वय १४), नादिया शेख (वय २२), नाभिल (वय २२) आणि मिसबाह (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. ते सर्व शिर्सीचे रहिवासी आहेत. पोलिस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, नादियाचे दोन आठवड्यांपूर्वी हासन येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. जवळपास ३० लोक पोस्ट वेडिंग पिकनिकसाठी आले होते.

कुटुंबातील सदस्य नदीजवळ खेळत असताना मुलगा नदीत पडला. कुटुंबातील इतर सदस्यांनी मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. रविवारी रात्री उशिरापर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी दोन मृतदेह बाहेर काढले. तर सोमवारी सकाळी शोधमोहीम सुरू होती. स्थानिक मच्छिमार मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांना मदत करत आहेत. वराच्या बाजूने शाल्मला नदीजवळ पार्टी आयोजित केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनला दणका! डोनाल्ड ट्रम्प यांची एक चूक अन् भारताने कमावले अब्जावधी रुपये; 'हे' देश भारताच्या प्रेमात

Pune Crime News: सोन्याची अंगठी ते फ्लॅटची मागणी, गर्भपातासाठी दबाव,तेजस्वीनने घेतला टोकाचा निर्णय

Latest Marathi News Live Update: नाशिकमधील महायुतीतील नेते उदय सामंतांच्या भेटीला

ना मुलांचा, ना नवऱ्याचा... अनुष्का शर्माच्या मोबाईलवर वॉलपेपर म्हणून आहे 'या' व्यक्तीचा फोटो; नेटकरीही झाले चकीत

Pali News : श्री बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी रांगा! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत संकष्टी चतुर्थीला भक्तिमळा फुलला

SCROLL FOR NEXT