तोडगा न काढल्यास उदयनराजेंच्या नेतृत्वात पुणे-बंगळूर महामार्गाचं काम बंद पाडू; माजी आमदाराचा स्पष्ट इशारा

पुणे-बंगळूर महामार्गाच्या (Pune-Bangalore Highway) सहापदरीकरणांतर्गत कऱ्हाड ते नांदलापूरदरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.
Pune-Bangalore Highway Udayanraje Bhosale
Pune-Bangalore Highway Udayanraje Bhosaleesakal
Summary

कऱ्हाड शहराला लोणावळ्यासारखे रूप देण्‍याचे काम फ्लायओव्हर ब्रीजच्या नवीन आराखड्यामुळे होणार आहे.

कऱ्हाड : पुणे-बंगळूर महामार्गाच्या (Pune-Bangalore Highway) सहापदरीकरणांतर्गत कऱ्हाड ते नांदलापूरदरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्या पुलावरून कोल्हापूर नाका ते कोयना पूलदरम्‍यान दोन्ही बाजूंनी कऱ्हाड शहरात येण्यासाठी रस्ताच देण्यात आलेला नाही. त्यामुळे कऱ्हाडचे महत्त्व कमी होऊन उद्योग-व्यवसायालाही फटका बसणार आहे.

त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्वपक्षीय लढा उभारण्यात येईल. १० जानेवारीपर्यंत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा न काढल्यास जनआंदोलन उभारून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा माजी आमदार आनंदराव पाटील व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Pune-Bangalore Highway Udayanraje Bhosale
आजरा कारखान्यावर मुश्रीफांचाच दबदबा; 19 जागांवर विजय मिळवत सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला दिलं धोबीपछाड

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माधवराव पवार, हरीश जोशी, चंद्रकांत पवार, एकनाथ बागडी, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, राजू मुल्ला, आर. टी. स्वामी, दादा शिंगण, दिनेश रैनाक, घनश्याम पेंढारकर, आनंदराव लादे, सागर बर्गे, नितीन काशीद, मनोज माळी, सुलोचना पवार यांच्यासह कऱ्हाड, मलकापूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘कऱ्हाड हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे ऐतिहासिक शहर आहे. ज्‍येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी महामार्ग कऱ्हाडमधून गेला, तर दळणवळण सुधारून शहराची प्रगती होईल, ही दूरदृष्टी ठेवली. आज त्यांचे स्वप्न भंग करण्याचा डाव आखून कऱ्हाड शहराला लोणावळ्यासारखे रूप देण्‍याचे काम फ्लायओव्हर ब्रीजच्या नवीन आराखड्यामुळे होणार आहे. साताऱ्यातील हॉटेल फर्न येथे महामार्गावरून खाली उतरवून शहरातील लोकांना ॲप्रोच रस्ता देऊन पुन्हा पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याचा उड्डाणपूल केला आहे.

Pune-Bangalore Highway Udayanraje Bhosale
प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी! सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वेचा 'हा' पूल पाडण्यात येणार; काय आहे कारण?

त्याचप्रमाणे कऱ्हाड व मलकापूर शहरांचे अस्तित्व अबाधित ठेवले पाहिजे. २०२०-२१ मध्‍ये महामार्ग विभागाचा कऱ्हाड- मलकापूर फ्लायओव्हरचा प्लॅन वेगळा होता आणि आज दुसऱ्याच प्लॅनप्रमाणे काम सुरू आहे. नांदलापूर फाटा ते ज्‍येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कमानीपुढे कोयना नदीच्या अलीकडे उतरणारा प्लॅन होता; परंतु हा प्लॅन नांदलापूर ते नदीपलीकडे वारुंजी- गोटे फाटा असा ओव्हरब्रीज केला आहे. त्यामुळे कऱ्हाड व मलकापूर शहराचे महत्त्व कमी होणार आहे.

खासदारांशी चर्चाविनिमय

कऱ्हाडचे लोणावळ्यासारखे चित्र होऊ नये म्हणून आम्ही पाठपुरावा करत आहोत. खासदार भोसले यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी, कऱ्हाड, मलकापूरचे लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील यांनाही निवेदन दिले आहे. कऱ्हाड शहराचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही लढा देणार आहोत. खासदार भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून सर्वपक्षीय लढा उभारण्यात येईल. १० जानेवारीपर्यंत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर तोडगा न काढल्यास जनआंदोलन उभारून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Pune-Bangalore Highway Udayanraje Bhosale
OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या; उदयनराजेंचं PM मोदींना साकडं

कऱ्हाडकरांच्‍या मते...

  • महामार्ग शहरातून गेल्‍यास दळणवळणासह प्रगती शक्‍य, ही यशवंतराव चव्‍हाणांची दूरदृष्‍टी.

  • कऱ्हाड हे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, गोव्‍यासह कर्नाटककडे जाण्‍यासाठी मध्‍यवर्ती ठिकाण.

  • फ्‍लायओव्‍हरच्‍या कामामुळे कऱ्हाडची स्‍थिती लोणावळ्यासारखी करण्‍याचा कुटिल डाव

  • २०२०-२१ मध्‍ये महामार्ग विभागाचा फ्लायओव्हरचा प्लॅन वेगळा होता आणि आज दुसऱ्याच प्लॅनप्रमाणे काम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com