Rajya sabha Team eSakal
देश

राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी निलंबनाची कारवाई!

यापूर्वी झालं होतं ८ खासदारांचं निलंबन.

सुधीर काकडे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला काल सूरूवात झाली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या 12 खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या पावसाळी अधिवेशनात अयोग्य वर्तन केल्याने या सदस्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेच्या इतिहासात ही सर्वात मोठी शिक्षा असून, पहिल्यांदाच एवढ्या खासदारांना एवढ्या काळासाठी निलंबीत करण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपसभापती हरिवंश यांच्या परवानगीने याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. विरोधकांच्या गदारोळातच सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला.

निलंबीत केलेल्या १२ सदस्यांमध्ये सीपीएमचे इलामाराम करीम, काँग्रेसच्या फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रताप सिंग, तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन आणि शांता छेत्री, प्रियांका चतुर्वेदी आणि शिवसेनेचे अनिल देसाई आणि CPI च्या विनय विश्वम यांचा समावेश आहे.

राज्यसभेत आजवर झालेलं हे सर्वाधिक सदस्यांचं निलंबन असल्याचं संसदीय कामाचा लेखाजोखा ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी 2020 मध्ये 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. ही संख्या दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. त्यावेळी डेरेक ओब्रायन (तृणमुल काँग्रेस), संजय सिंग (आम आदमी पार्टी), राजीव सातव (काँग्रेस), केके नागेश (सीपीएम), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), रिपुन बोरा (काँग्रेस), डोला सेन (तृणमूल काँग्रेस) आणि एलमाराम करीम. (सीपीएम) यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

SCROLL FOR NEXT