S Jaishankar
S Jaishankar  esakal
देश

BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर सहभागी, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज गुरुवारी (ता.१९) ब्रिक्सच्या (Brics) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. यात आठ प्रमुख बिंदुंवर प्रकाश टाकत जयशंकर (S Jaishankar) म्हणाले, की आपल्याला केवळ कोविड महामारीपासून सामाजिक-आर्थिक सुधारणा करण्याचा शोध घ्यावा लागेल. तसेच लवचिक आणि विश्वसनीय पुरवठा साखळीही बनवायला हवी. (Foreign Minister S Jaishankar Participated In Brics Meeting)

सीमेवर दहशतवादावर दाखवावे झिरो टाॅलरन्स

जयशंकर म्हणाले, की युक्रेन युद्धामुळे ऊर्जेची मागणी आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. जगाच्या भल्यासाठी त्यावर नियंत्रण असायला हवे. ते म्हणाले, की ब्रिक्सने वेळोवेळी सार्वभौमत्व, समानता, प्रादेशिक अखंडता, आंतरराष्ट्रीय कायदे व करारांचा सन्मान करायला हवा. ब्रिक्सला दहशतवाद, विशेषतः सीमेवर दहशतवादासाठी झिरो टाॅलरन्स दाखवायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT