
भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात, रोहित पवारांचा दरेकरांना सवाल
अहमदनगर : रोहित पवारांना भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका व सल्ला देण्याची घाई करु नये, असा सल्ला दिला आहे. याचा समाचार पवार यांनी ट्विट करुन घेतला आहे. ते म्हणतात, दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का ? अशांना महत्त्व देत नाही. पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात ?, असा प्रश्न रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रवीण दरेकर यांना केला आहे. (Rohit Pawar Ask Pravin Darekar Why Keep Mum BJP's Big Leaders)
हेही वाचा: "पवार बोलतात ते..." Open mike मध्ये जलील यांनी घेतली फिरकी
आणि मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/ त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे, असे ते म्हणाले. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करण काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात. आणि हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरतर आपण सर्वांनीच जपायला हवी, असा सल्ला रोहित पवार यांनी दरेकर यांना दिला आहे.
हेही वाचा: टाटा करणार पाच ब्रँड्सची खरेदी? अंबानींच्या रिलायन्सला देणार टक्कर
दरेकर काय म्हणाले होते?
रोहित पवार वयाने लहान आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायला शरद पवार आणि अजित पवार साहेब आहेत. त्यामुळे त्यांनी इतक्यात भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका करण्याची किंबहुना सल्ला देण्याची घाई करु नये, अशी टीका दरेकरांनी रोहित पवारांवर केली आहे.
Web Title: Rohit Pawar Ask Pravin Darekar Why Keep Mum Bjps Big Leaders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..