corona vaccine registration, corona vaccine  
देश

सावधान! लस टोचून घेण्यासाठी नंबर लावा म्हणत नोंदणीच्या नावाखाली लूट

सकाळ ऑनलाईन टीम

Corona vaccine news : देशात नव्या वर्षात लसीकरणाला सुरुवात करण्याच्या दृष्टिने सरकार पावले उचलत आहे. दुसरीकडे लसीकरणाच्या नावाखाली नागरिकांना लुटणारी टोळीही सक्रीय होत आहे. सायबर चोरांनी लसीकरणाच्या नावाखाली लूट करण्यास सुरुवात केली असून या संबंधितील एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गाझियाबाद येथील एका कुटुंबियांने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या नावाखाली आपल्यालाही कोणी फेक कॉल करुन लुटणार नाही, याची खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.  

काय आहे प्रकरण 
गाझियाबाद येथील क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबियांने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी त्यांना एक नंबरवरुन कॉल आला होता. दिल्लीच्या आरोग्य विभागातून बोलत असल्याचे सांगत लसीकरणासाठी नाव नोंदणी सुरु असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. कॉलची कोणतीही पडताळणी न करत कुटुंब प्रमुख असलेल्या अरुण यांनी कुटुंबियांतील व्यक्तींची माहिती पुरवली. जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ज्याचे नाव नोंद असेल त्यांनी प्रथम लस दिली जाणार असल्याची माहिती कॉलवरुन त्यांना देण्यात आली. त्यांनी सर्व माहिती दिल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी त्यांना प्रवृत करण्यात आले.  

#CoronavirusStrain: आणखी दोन देशांमध्ये नव्या कोरोनाची एन्ट्री​

नोंदणीसाठी 2000 रुपये भरल्यानंतर फसवणूक झाल्याचे उमगले

कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी पत्नी, मुलगी आणि स्वत:चे नाव नोंद केले. त्यानंतर पुन्हा कॉल आला. सदस्यांच्या सर्व माहितीसह 2 हजार रुपये भरण्यााचे त्यांना सांगण्यात आले. तीन फॉर्म भरल्यानंतर मोबाईल बंद झाला. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले, अशी माहिती तक्रारदाराने पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT