
या पहिल्या रुग्णासह अन्य कोरोनाबाधितांना ‘व्हिओसी २०२०१२/०१’या प्रकारचा संसर्ग झाल्याचा संशय असून राष्ट्रीय पाश्चर इन्स्टिट्यूटमधील विशेष प्रयोगशाळांमध्ये त्याची तपासणी सुरू आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
पॅरिस : ब्रिटनपाठोपाठ आता फ्रान्स आणि लेबनॉनमध्येही कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. याचा संसर्ग झाल्याच्या पहिला रुग्ण समोर आल्यानंतर या देशांनी तातडीने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातले आहेत. ब्रिटनमधून होणारी वाहतूकही सहा जानेवारीपर्यंत मर्यादित ठेवली आहे.
लंडनहून १९ डिसेंबरला फ्रान्सला परतलेल्या फ्रेंच नागरिकाची कोरोना चाचणी शुक्रवारी (ता. २५) पॉझिटिव्ह आली. त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसत नसून त्याला त्याच्या घरी विलगीकरणात ठेवले आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
- VIDEO - ख्रिसमस सेलिब्रेशनवेळी झाला स्फोट; हवेत उडाल्या गाड्या
या पहिल्या रुग्णासह अन्य कोरोनाबाधितांना ‘व्हिओसी २०२०१२/०१’या प्रकारचा संसर्ग झाल्याचा संशय असून राष्ट्रीय पाश्चर इन्स्टिट्यूटमधील विशेष प्रयोगशाळांमध्ये त्याची तपासणी सुरू आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.
लेबनॉनमध्येही कोरोनाचा नवीन प्रकार आढळला असून लंडनहून विमानाने आलेल्या प्रवाशाला या प्रकारचा विषाणूंचा संसर्ग झाला आहे. मिडल इस्ट एअरलाइन्सचे २०२ विमान हे २१ डिसेंबर रोजी लेबनॉनमध्ये आले. त्यावेळी विमानातील सर्व प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना खबरदारीचे उपाय करण्यास सांगितले आहे, असे देशाचे काळजीवाहू आरोग्यमंत्री हमाद हसन यांनी शुक्रवारी (ता.२५) सांगितले.
- अमेरिकन लोकांसाठी पॅकेजला मंजुरी द्यायची सोडून ट्रम्प गेले गोल्फ खेळायला
आणखी कोणत्या देशात आढळले रुग्ण
रोममध्येही कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. तसेच युकेमधून जपानमध्ये आलेल्या ५ प्रवाशांनाही या कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. तसेच सिंगापूरमध्ये १, डेन्मार्कमध्ये ९, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
या देशांनी घातली प्रवासबंदी
५० हून अधिक देशांनी ब्रिटन प्रवासावर बंदी घातल्यानंतर युकेच्या पंतप्रधानांनी लंडनमध्ये कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. तर चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, आयर्लंड, बेल्जियम, कॅनडा, भारत, पाकिस्तान, पोलंड, स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन, रशिया आणि जॉर्डन या देशांनी युकेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. तसेच सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या आखाती देशांनीही आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत.
- मॉडर्नाच्या लशीने डॉक्टरला ॲलर्जी; अमेरिकेत लसीकरणानंतरची पहिली घटना
नव्या कोरोना विषाणूमुळे ६८ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून युके हा युरोपमधील सर्वाधिक फटका बसलेला देश ठरला आहे.
दरम्यान, फ्रान्समध्ये २०,२६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लेबेनॉनमध्ये १ लाख ६५ हजारहून अधिक रुग्ण आढळले असून १ हजार मृत्यूंची नोंद झाली आहे.
- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)