girl wash coriander with soap in fear of coronavirus video viral 
देश

कोरोनामुळे कोथिंबीर धुतली साबणाने; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्यापासून दूर राहण्यासाठी अनेकजण काळजी घेऊ लागले आहेत. एका मुलीने तर कोथिंबीर चक्क साबणाने धुवून घेतली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू अवरेनासे झाले आहे.

भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकजण घाबरले आहेत तर अनेकजण काळजी घेताना दिसत आहेत. करोनाच्या भीतीमुळे अनेकजण बाहेरील कोणतीही वस्तू घरात आणण्यापूर्वी स्वच्छ करून घेत आहेत. काही जण भाज्या गरम पाण्याने धुवून घेत आहेत. शिवाय, स्वच्छतेसाठी सॅनिटाइझर, मास्कचा वापर केला जात आहे. पण, टिकटॉकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करोनाच्या भीतीमुळे एक मुलगी कोथिंबीर चक्क साबणाने धुवून घेताना दिसते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला असून, चार कोटींहून अधिक जणांनी तो बघितला आहे. यावरून या व्हिडिओची प्रसिद्धी पाहायला मिळते. व्हिडिओ पाहून नेटिझन्सना हसू आवरेनासे होत आहे. शिवाय, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. एकाने म्हटले आहे की, कोथिंबिर वॉशिंग मशीनमध्ये धुतली तर अजून स्वच्छ झाली असती.

@1993pikachu

इस वायरस ने सबको परेशान किया है corona ki dehsat ##coronavirus

♬ original sound - Mehmood J

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

मोठी बातमी! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बस वाटेत बंद पडल्यास ‘शिवाई’तूनही करता येणार त्याच तिकीटावर प्रवास; प्रवाशाने मागितले तर तिकीटाचे पैसेही मिळतात परत

SCROLL FOR NEXT