esakal | पाकिस्तानला धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

indian army destroy 10 pakistani army post loc jammu kashmir video viral

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

पाकिस्तानला धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर: पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. पाकिस्तानला धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला...

पाकिस्तानने गुरुवारी (ता. 11) केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला होता. पाकिस्तानने आज (शुक्रवार) पहाटेपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरवात केली. राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 10 चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात राजौरीच्या नौशेरा येथे एक पोलिस जखमी झाला आहे. सम्हानी सेक्टरमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात जवानांना यश मिळाले आहे.

Video: क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना...

दरम्यान, पाकिस्तानला धडकी भरवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जवानांनी केलेल्या कारवाई पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या कुरघोडी दिवसेंदिवस सुरू आहेत. हिंदवाडा पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत 3 जणांच्या मुस्क्‍या आवळल्या असून, ते लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम, ड्रग्स आणि काही साहित्य जप्त करण्यात आले आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हॅंडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 21 किलो हेरोइन आहे. बाजारात त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ड्रग्स पुरवण्याचे काम हे तिघे करत होते.

loading image