देश

नो डुलकी, नो अपघात! गुजरातच्या कॉलेज बॉयने बनवला भन्नाट चष्मा

अपघातामुळे होणारे अपघात टाळता यावेत म्हणून या बारावीच्या विद्यार्थ्यानं हा चष्मा तयार केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'एक डुलकी, एक अपघात' असा फलक प्रत्येकानेच प्रवास (Travelling) करताना वाचला असेल. गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला (Driver) डुलकीमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल (Road Accidents) चांगलीच माहिती असते. त्यात रात्रीच्या वेळेला येणाऱ्या अडचणीही मोठ्या असतात. रस्त्यावर असलेला अंधार अन् त्यात डोळ्यावर झोप यामुळे रोज शेकडो अपघात घडतात. फक्त रात्रीच नाही तर दिवसाही अशा घटना घडतात. मात्र या सर्व अडचणींवर नेमका उपाय काय? याचं उत्तर आपल्याला कुणालाच सापडणार नाही. मात्र गुजरातच्या एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं यावर भन्नाट उपाय शोधला आहे.

डुलकीमुळे होणारे अपघात टाळता यावेत यासाठी सूरतमध्ये राहणाऱ्या नवाब सुफियान शेखने एक चष्मा बनवला आहे. मागच्या काही काळात त्याच्या जवळच्या लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यावर उपाय म्हणून त्याने हा चष्मा तयार केला. डुलकीमुळे होणारे अपघात टाळता आल्यास अनेकांचे जीव वाचतील असा विचार आला आणि त्याने हा चष्मा तयार केला. हा चष्मा बनवण्यासाठी त्याला हजार रुपयांपेक्षाही कमी खर्च आला.

कसा आहे हा चष्मा?

नवाब सुफियान शेखने (Nawab Sufiyan Shaikh) तयार केलेला हा चष्मा म्हणजे एक भन्नाट गॅजेट आहे. या चष्म्यामध्ये त्याने एक सेन्सर फीट केलेलं आहे. हे सेन्सर सतत तुमच्या डोळ्यांकडे लक्ष देऊन असतं. त्यामुळे तुमचा डोळा लागला की लगेच हे सेन्सर वाजू लागतं. फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या बाजूला बसलेली व्यक्ती देखील त्यामुळे अलर्ट होते. या सेन्सरसाठी लागणारी बॅटरी त्यानं चष्म्याच्या दुसऱ्या बाजूला बसवली आहे. एकुणच हा चष्मा किती फायदेशीर ठरतो, त्याचा वापर होऊ शकेल का, हे पाहावं लागणार आहे. मात्र त्याने केलेल्या या कामाचं सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Live Updates Marathi : निष्पक्षपणे चर्चा करायची असेल तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आधी झाला पाहिजे- मल्लिकार्जून खर्गे

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT