hydroxychloroquine 
देश

केंद्राने हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठविली 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनावरील उपचारांसाठी प्रभावी समजल्या जाणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (एचसीक्यू) निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती केंद्रीय रसायन व खतेमंत्री सदानंद गौडा यांनी बुधवारी दिली. 

याविषयी माहिती देताना गौडा यांनी सांगितले, की औषधनिर्माण विभागाने एचसीक्यूच्या सूत्रीकरणासह निर्यातीवरील बंदी हटविण्यास मान्यता दिली आहे. याविषयी अधिसूचना काढण्याचे आदेश देण्यात आले असून, उत्पादकांना आपल्या एकूण उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन पुरवठा देशांतर्गत बाजारात करावा लागेल, अशी अट यामध्ये ठेवण्यात आली आहे. गौडा यांच्या घोषणेनंतर लागलीच विदेश व्यापार महासंचालनालयाने निदानसूचक उपकरण, प्रयोगशाळेतील उपकरण आणि निदान यंत्रांच्या निर्यात धोरणाबाबत सुधारित अधिसूचना जारी केली आहे. 

दरम्यान, काही अभ्यासांचा असा दावा आहे की, एचसीक्यू कोरोना विषाणूला प्रतिबंध करू शकत नाही, इतरांना असे आढळले आहे की, हे मलेरियाविरोधी औषध कोविड -१९ पासून संक्रमित रुग्णांच्या पुनर्प्राप्तीस मदत किंवा वेग देत नाही, तर काही आठवड्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील एचसीक्यूला त्या विषाणूजन्य आजाराच्या प्रयोगात्मक उपचारांमध्ये जागतिक स्तरावरील अभ्यासातून वगळले होते; परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी एचसीक्यूची चाचणी पुन्हा सुरू केली होती, तर काही संशोधकांच्या मते एचसीक्यू हे औषध कोरोनावरिल उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT