hyderabad rape case reaction of girls father nirbhaya mother reaction 
देश

'दिशाला न्याय मिळाला'; दिल्लीच्या निर्भयाला कधी?

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : दहा दिवसांपूर्वी, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून, तिला जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना आज, सायबराबात पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण, आज, एन्काऊंटरनंतर घडलं ते योग्यच घडलं, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

'मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल'
बलात्कार झालेल्या तरुणीचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. पोलिस आयुक्त सीव्ही सज्जनार यांनी तिला दिशा असे नाव दिले होते. आज, एन्काऊंटर नंतर दिशाच्या वडिलांच्या भावना मीडियाने जाणून घेतल्या. ते म्हणाले, 'माझ्या मुलीचा मृत्यू होऊन दहा दिवस झाले आहेत. पोलिसांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.'

हैदराबादमधील पीडितेला लवकर न्याय मिळाला. आरोपींचा खात्मा केल्याचा मला आनंद होत आहे. पोलिसांनी अतिशय योग्य काम केले आहे. पोलिसांवर या प्रकरणाात कोणत्याही प्रकारे कारवाई करू नये, अशी माझी मागणी आहे. 
- आशा देवी, दिल्लीतील निर्भयाची आई

निर्भयाला न्याय कधी?
दरम्यान, सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आई आशा देवी म्हणाल्या, 'गेल्या सात वर्षांपासून मी संघर्ष करत आहे. मी या देशातील न्याय व्यवस्थेकडे आणि सरकारकडे न्याय देण्याची मागणी करत आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी.' राम सिंह, मुकेशसिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि एक अल्पवनीय आरोपी, असे पाच जण याप्रकरणात आरोपी होते. यातील राम सिंहने 11 मार्च 2013 तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर इतर चौघांच्या फाशीची प्रतीक्षा आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT