देश

"...तर तोकडे कपडे घालणारी राखी गांधींपेक्षा महान"

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : केवळ तोकडे कपडे घातल्यामुळे कुणी महान बनू शकले असते तर राखी सावंत ही महात्मा गांधी यांच्यापेक्षा महान ठरली असती, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ह्रदयनारायण दिक्षीत यांनी केले. सत्ताधारी भाजपच्या प्रबुद्ध वर्ग संमेलनात त्यांनी हे वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांच्यावर सोशल मिडीयामधून बरीच टीका होत आहे. उन्नाव जिल्ह्यातील बंगार्माऊ विधानसभा मतदारसंघात बुद्धिवंतांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी हा उपक्रम आखण्यात आला आहे.

दीक्षित म्हणाले की, गांधीजी गरजेपुरते कपडे घालत असत. ते केवळ धोतर गुंडाळत. देश त्यांना बापू या नावाने संबोधायचा. फक्त कपडे कमी घातल्यामुळे कुणी महान बनले असते तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत श्रेष्ठ ठरली असती. ते पुढे असेही म्हणाले की, आमच्यामते कोणत्याही विषयावर पुस्तक लिहील्यामुळे कुणी बुद्धिमान बनत नाही. अनेक वर्षांपासून तशी स्थिती असती तर मी किमान सहा हजार पुस्तके वाचली आहेत.

व्हायरल व्हिडिओवर हिंदीतून खुलासे

दिक्षीत यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाला. त्यानंतर दीक्षित यांनी हिंदीतून सलग ट्विट केल्या. खुलासे करताना त्यांनी म्हटले आहे की, सोशल मिडीयातील काही मित्र माझ्या भाषणाच्या क्लीपवरून चुकीचा अर्थ काढत आहेत. मी आत्मसाक्षात्कार झालेला लेखक आहे, अशी ओळख संमेलनाच्या सुत्रसंचालकांनी करून दिली. त्यांचा मुद्दा मी पुढे नेत म्हणालो की, केवळ काही पुस्तके लिहील्यामुळे कुणी बुद्धिमान बनत नाही. महात्मा गांधी गरजेपुरते कपडे घालत असत. देश त्यांना बापू म्हणायचा, पण म्हणून राखी सावंत ही गांधीजी बनणार असे नाही. मित्रांनो माझे भाषण योग्य संदर्भात घ्या, असेही दिक्षीत यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT