Independence Day esakal
देश

Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून येणार मजूर-मच्छीमार-सरपंच आणि शिक्षक

यंदा लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात नेहमी पेक्षा वेगळे पाहुणे सहभागी होणार

सकाळ डिजिटल टीम

Independence Day : यंदा लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात नेहमी पेक्षा वेगळे पाहुणे सहभागी होणार आहेत. सरकारने 1800 विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. यात संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कामगारांचाही समावेश आहे.

यावेळी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी 1800 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये मजूर, मच्छीमार, सरपंच, परिचारिका आणि शिक्षक यांचा समावेश आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामाशी संबंधित कामगारांनाही या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना पत्नीसह कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक संघटना योजनेशी संबंधित शेतकरीही या समारंभात सहभागी होणार आहेत.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 2023 च्या 77 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षकांना प्रतिष्ठित 'विशेष पाहुणे' म्हणून आमंत्रित केले आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून 50 शाळा शिक्षकांच्या निवडक गटाला आमंत्रित करण्यात आले होते ज्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व शिक्षक हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि देशभरातील केंद्रीय विद्यालय संघटना शाळांमधील आहेत.

संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेशातील 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक पोशाखात लाल किल्ल्यावर होणार्‍या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली. सुमारे 1,800 लोकांना त्यांच्या जोडीदारासह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. शासनाच्या लोकसहभागाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

हे विशेष अतिथी असतील

या विशेष पाहुण्यांमध्ये 660 हून अधिक गावांचे 400 हून अधिक सरपंच, शेतकरी उत्पादक संस्था योजनेशी संबंधित 250 शेतकरी, नवीन संसद भवनासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाशी संबंधित 50 कामगारांचा समावेश असेल. याशिवाय खादी कामगार, सीमा रस्त्यांचे बांधकाम, अमृत सरोवर आणि हर घर जल योजना, तसेच प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार यांच्याशी संबंधित लोकांचा सहभाग असेल.

सेल्फी पॉइंट

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीतील विविध 12 ठिकाणी सेल्फी पॉइंटही बनवण्यात आले आहेत. यामध्ये नॅशनल वॉर मेमोरियल, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्टेशन, राजीव चौक मेट्रो स्टेशन, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वाराचा समावेश आहे. तयार केलेले सर्व सेल्फी पॉइंट केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रम प्रदर्शित करतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT