INDIA Alliance Seat Sharing  
देश

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'इंडिया आघाडी' जागावाटप ठरलं! काँग्रेस लढणार 'इतक्या' जागा

INDIA Alliance Seat Sharing : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही माहिती दिली आहे.

रोहित कणसे

INDIA Alliance Seat Sharing : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप पूर्ण झालं आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये अकरा जागांवर निवडणूक लढवणार आहे. अखिलेश यादव म्हणाले की, काँग्रेससोबतची आमची सौहार्दपूर्ण आघाडी ११ मजबूत जागांसह चांगली सुरुवात करत आहे… ही परंपरा विजयी समीकरणे पुढेही पाहायला मिळेस . 'इंडिया'ची टीम आणि 'पीडीए'ची रणनीती इतिहास बदलेल, असेही यादव म्हणाले आहेत.

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाची घोषणा केली आहे.

सपा-काँग्रेसमध्ये जागांवर शिक्कामोर्तब

उत्तर प्रदेशमध्ये सपाने काँग्रेसला ११ जागा देण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी रायबरेली आणि अमेठी या दोन जागा विचारात घेतल्या जात आहेत. याशिवाय आणखी कोणत्या नऊ जागा दिल्या आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वृत्तानुसार, काँग्रेस पश्चिम उत्तर प्रदेशातील चार जागांवर निवडणूक लढवू शकते. यापैकी एक जागा अमरोहा असू शकते, जिथे कुंवर दानिश अली खासदार आहेत. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येच त्यांची बसपातून हकालपट्टी करण्यात आली होती.

पश्चिम उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पूर्वांचल आणि बुंदेलखंडमध्येही काँग्रेसला जागा दिल्या जाऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस जागांबाबत निर्णय घेणार असल्याचे सपा अध्यक्षांनी आधीच सांगितले होते आणि आता सपानेही याची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला रायबरेलीच्या एकच जागेवर विजय मिळाला होता. तर अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT