Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal

Maratha Reservation Latest News : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये 'सगेसोयरे'या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे.

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्यागणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

सरकारने जारी केलेल्या जीआमध्ये सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. जीआर नुसार, अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगेसोयरे असतील. तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जीआरमध्ये (GR) करण्यात आला आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : जरांगे पाटलांच्या अखेर कोणत्या मागण्या झाल्या मान्य? एका क्लिकवर घ्या जाणून

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील नातेवाईक, असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

तसेच कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन केतकी चितळेची पोस्ट; म्हणाली, प्रजासत्ताकदिनी जातीय सर्व्हेक्षण...

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील. सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

Maratha Reservation
Maratha Victory: मिळवून दाखवलं का नाही! मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना खिजवलं!

घडमोडी कशा घडल्या?

● रात्री ११:३० च्या सुमारास सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला.

● शिष्टमंडळासोबत जवळपास तीन तास चर्चा

● मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारकडून मान्य.

● सोयरे शब्द अध्यादेशात समाविष्ट करण्यात आला.

● रात्री ३:०० सुमारास मंत्री दिपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न.

● आज (शनिवार) सकाळी वाशी येथे शिवाजी चौकात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उपोषण सोडलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com