Corona Update 
देश

भारतात नवीन रुग्णांच्या संख्येत घट; केरळने वाढवलीय चिंता

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.1 टक्के आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली - गेल्या 24 तासात देशात 30 हजार 941 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या 3 लाख 70 हजार 640 इतकी आहे. तर रिकव्हरी रेट हा 97.53 टक्के इतका आहे. सोमवारी दिवसभरात देशात कोरोनामुळे 350 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये अद्याप कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. काल दिवसभरात केरळमध्ये 19 हजार 622 नवे रुग्ण सापडले असून 132 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात काल दिवसभरात 36 हजार 275 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 19 लाख 59 हजार 680 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.1 टक्के आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा 2.22 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात नव्या रुग्णसंख्येत थोडी घट झाली आहे. सोमवारी दिवसभरात 3,741 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 64,60,680 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51,834 इतकी झाली. तर आज दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून आज 4,696 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,68,112 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.2 टक्के एवढं झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT