Missile 
देश

भारतीय मिसाईल चुकून पाकिस्तानमध्ये पडले, भारताने व्यक्त केली दिलगिरी

भारताने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी (ता.११) मान्य केले की चुकून मिसाईल भारतीय लष्करी तळावरुन पाकिस्तानमध्ये नऊ मार्च रोजी पडले होते. भारताने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी (ता.दहा) पत्रकार परिषद घेतली. त्यात भारतीय मिसाईलमुळे पाकिस्तानी हवाईक्षेत्र आणि काही भागाचे नुकसान झाले. हे पाकिस्तानच्या (Pakistan) लष्कराच्या मिआन चन्नू भागात पडले होते, पत्रकार परिषदेत म्हटले. भारतीय (India) संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. जीवितहानी न झाल्याने एक दिलासा मिळाल्याचे मंत्रालयाने म्हणाले. ९ मार्च २०२२ रोजी दैनंदिन देखभालचे काम चालू असताना तांत्रिक चुकीने अचानक मिसाईल डागले गेले. (India Regrets Accidental Firing Of Missil In India)

ते पाकिस्तानमध्ये पडले. भारत सरकार या घटनेबाबत गंभीर असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मिसाईल पाकिस्तानच्या भागात पडले. ही घटना खेदजनक असून यात कोणतीही जीवितहानी न झाल्याने एक दिलासा मिळाला आहे, असे मंत्रालय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

SCROLL FOR NEXT