Sputnik Vaccine 
देश

मे अखेरीस भारतात येणार स्फुटनिक व्ही लस; लवकरच भारतातही होणार उत्पादन

भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लशीकरणास सुरवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. गेल्या 24 तासांत भारतात तर तब्बल दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या भारतात लशीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, तरीही भारतातील कोरोनाचे संक्रमण काही थांबायचे नाव घेत नाहीये. या साऱ्या पार्श्वभूमीवरच आता देशात लशीकरणाच्या अभियानामध्ये आणखी एका लशीला समाविष्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने रशियन लस स्फुटनिक व्ही ला मे अखेरपर्यंत आयात करण्याचा आदेश दिला आहे. भारताच्या आधी अर्जेंटीना, मेक्सिकोसहित 59 देशांनी रशियन लशीचा वापर करण्यास मंजूरी दिली आहे.

भारतात तिसऱ्या लशीला मंजूरी

भारतात गेल्या 16 जानेवारीपासून लशीकरणास सुरवात झाली आहे. भारतात निर्माण केली गेलेली कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींना भारतात परवानगी देऊन लशीकरणास सुरवात करण्यात आली होती. आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. रशियात बनवली गेलेली स्फुटनिक व्ही ही लस भारतात मे अखेरीस येण्याची आशा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत भारतात आणखी पाच लशी उपलब्ध होतील. सध्या भारतात दोन लशी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचं उत्पादन होत आहे.

जुलैपासून होणार लशीचं उत्पादन

भारतातील औषध नियंत्रक संस्था ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) रशियन लस स्फुटनिक व्हीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. डीसीजीआय कुठल्याही औषधाच्या वापराला मंजूरी देण्याआधी त्या औषधाच्या सुरक्षितेची आणि परिणामकारकतेची खात्री करते. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनला देखील मंजूरी देण्यासाठी अशाच प्रकारच्या परिक्षणातून जावं लागलं होतं. डॉ. रेड्डीज् लॅब्ससोबत स्फुटनिक व्ही यांचा करार झाला आहे. जून अथवा जुलैच्या अखेरीस भारतातील स्थानिक उत्पादन भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशात या रशीयन लशीव्यतिरिक्त आणखी पाच लशी लवकरच उपलब्ध करवून दिल्या जाणार आहेत. याचा अर्थ येत्या काही महिन्यांमध्ये स्फुटनिक व्हीच्या कमीतकमी 50 मिलीयन डोसचे उत्पादन सुरु होतील. तज्ज्ञांनी म्हटलंय की, स्फुटनिक 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असणाऱ्या लशींपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT