indian army indian army
देश

भारतीय लष्कराचे चिनार कॉर्प्सचे हँडल ब्लॉक; फेसबुककडून प्रतिक्रिया नाही

फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया आली नाही

सकाळ डिजिटल टीम

फेसबुक आणि इंस्टाग्रामने भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सची पेज आणि हँडल एका आठवड्यापेक्षा जास्त काळासाठी ब्लॉक केले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या संदर्भात फेसबुककडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेस सीमेपलीकडून पसरवले जाणारे खोटे प्रचार थांबवण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यातील खऱ्या परिस्थितीबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हे प्रकरण फेसबुकशी संबंधित अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले होते. परंतु, अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काश्मीरमधील लष्कराच्या XV कॉर्प्सचे लोकप्रिय नाव असलेल्या चिनार कॉर्प्सच्या (indian army) फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर ‘तुम्ही फॉलो करीत असलेली लिंक एकतर चुकीची आहे किंवा पेज काढून टाकण्यात आले आहे’ असा संदेश प्रदर्शित करण्यात आला आहे. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामकडून या प्रकरणावर त्वरित प्रतिक्रिया आली नाही.

फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम हे एकाच कंपनीचे भाग आहेत. पेजवर दिलेली माहिती कंपनीने बनवलेल्या नियमांचे पालन करीत नाही असे वाटल्यास दोन्ही सोशल मीडिया वेबसाइट्स असे कोणतेही पेज काढून टाकतात. नाहीतर लोक त्याबद्दल कंपनीला तक्रार करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT