अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईत? याच आठवड्यात निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर की मुंबईत? याच आठवड्यात निर्णय

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) नागपूरला (Nagpur) घेण्याची घोषणा सरकारने केली असली तरी अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. या आठवड्यात संसदीय कामकाज सल्लागार समिती बैठक घेऊन अधिवेशन नागपूरला किंवा मुंबईला होईल याबाबतचा निर्णय अंतिम होणार असल्याची माहिती आहे.

करारानुसार एक अधिवेशन नागपूर होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झालीत. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षात एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही.

हेही वाचा: देशात तीन वर्षांत तब्बल इतक्या शेतकऱ्यांची आत्महत्या : केंद्र सरकार

कोरोनामुळे उत्पन्नावर झालेला परिणाम आणि होणार खर्च लक्षात घेता मागील वर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास सरकारमधीलच काही मंत्र्यांनी विरोध दर्शविल्याने होता. त्यामुळे ते झाले नाही. मुंबईला (Mumbai) झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) नागपूरला घेण्याची घोषणा केली होती. घोषणेनुसार २८ फेब्रुवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने १६ फेब्रुवारीपासून सचिवालयाचे काम नागपूरमध्ये (Nagpur) सुरू होणार असल्याचे परिपत्रकही काढले.

सचिवालयाचे कामकाच सुरू होण्यास फक्त आठवडाभरच आहे. परंतु अद्याप शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाला नाही. तयारीसाठी प्रशासनाला आठवडाभराच वेळ मिळणार आहे. ऐवढ्या कमी वेळात काम करायचे कसे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत किंवा नागपूरला घ्यायचे, याबाबतच निर्णय होईल.

हेही वाचा: राग अनावर : जावयाने सासूला ढकलले विहिरीत; बुडून मृत्यू

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. या आठवड्यात बैठक न घेतल्यास अधिवेनश मुंबईलाच (Mumbai) घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट होईल. तसे न झाल्यास अधिवेशनाची सुरू करण्याची मुदत वाढवावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सहा वेळा एकही अधिवेशन नाही

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आतापर्यंत सहा वेळा एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही. वर्ष १९६२,१९६३,१९७९,१९८५, २०२० व वर्ष २०२१ ला नागपूरमध्ये (Nagpur) एकही अधिवेशन झाले नाही. १९८६ ला झालेल्या चार अधिवेशनांपैकी २ अधिवेशन नागपूरला झाली होती. यातील एक अधिवेशन जानेवारीत झाले होते. परंतु नंतर मार्च महिन्यात मुंबईला अधिवेशन घेण्यात आले.

Web Title: Budget Session Nagpur Mumbai State Government Decision This Week

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..