देश

Admirals Epaulettes: शिवरायांची प्रेरणा! भारतीय नौदलात अ‍ॅडमिरल रँकच्या अधिकाऱ्यांचे बॅज बदलले

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगातील पहिलं आरमार उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलात आता अनेक बदल केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सिंधुदुर्ग इथं झालेल्या नेव्ही डेच्या कार्यक्रमात एक मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, आता नव्या बॅजची डिझाइन्स प्रसिद्ध करण्यात आली आहेत. (Indian Navy unveils the new Design of Admirals Epaulettes)

नौदलानं शेअर केला व्हिडिओ

नौदलानं या अ‍ॅडमिरल बॅजचा व्हिडिओ शेअर केला असून हे बॅज पूर्णतः बदलण्यात आले आहेत. यामध्ये रिअर अ‍ॅडमिरल, सर्जन रिअर अ‍ॅडमिरल, सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरल आणि अ‍ॅडमिरल या अ‍ॅडमिरल पदांसाठीचे इपॉलेट्स अर्थात खांद्यावरील बॅजमध्ये बदल करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

असे असतील बॅज

  1. रिअर अ‍ॅडमिरल - ब्लॅक बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी दोन फुलांची चन्हं.

  2. सर्जन रिअर अ‍ॅडमिरल - रेड बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी दोन फुलांची चन्हं.

  3. व्हाइस अ‍ॅडमिरल - ब्लॅक बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी तीन फुलांची चन्हं.

  4. सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरल - रेड बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी तीन फुलांची चन्हं.

  5. अ‍ॅडमिरल - ब्लॅक बॉर्डर असलेल्या मोठ्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी चार फुलांची चन्हं.

मोदींनी काय घोषणा केली होती?

सिंधुदुर्ग इथं नेव्ही डे निमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले होते की, आता नौदलाच्या इपोलेट्समध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब आपल्या सर्वांना दिसेल. जेव्हा लोकांचे संकल्प, भावना आणि आकांक्षा एकत्र येतात.

तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतात. गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती आणि आपल्या वारशाच्या गर्वाची घोषणा करतो आहे. भारतानंचं नौदलाच्या संकल्पनेला जन्म दिला आणि सामर्थ्य दिलं आणि जगानं ते स्विकारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT