देश

Instagram India Pakistan Love : इंस्टाग्रामवर झाल प्रेम ; पाकिस्तानमधून आलं बोलवणं अन् विमानतळावर पकडली गेली आणखी एक 'अंजू'

सकाळ डिजिटल टीम

Instagram India Pakistan Love : PUBG खेळताना पाकिस्तानची सीमा हैदर भारताच्या सचिनच्या प्रेमात पडली. फेसबुकवर प्रेमात पडून भारतातली अंजु पाकिस्तानातल्या मुलाच्या प्रेमात पडली. सर्व घटना ताज्या असतांनाच अशीच अजून एक घटना भारतातून समोर आली आहे.

पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जयपूर विमानतळावर १६ वर्षीय तरुणीला पकडण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर ती एका पाकिस्तानच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. या १६ वर्षीय मुलीला लाहोरला जायचे होते.

अधिक माहिती अशी कि, हि मुलगी पाकिस्तानच्या अस्लम लाहोरी या मुलाच्या प्रेमात पडली होती. जयपूर विमानतळावर 16 वर्षीय तरुणीला पकडण्यात आले आहे. या मुलीला तिच्या प्रियकराने एरपोर्टला जाण्याचे सांगितले. स्वत:ला पाकिस्तानी सांगून विमानतळावर जाण्याचा सल्ला दिला. त्याच्या सांगण्यावरून तरुणीने विमानतळावर पोहोचून पाकिस्तानचे तिकीट मागितले, पण तिच्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता.

विमानतळ स्टेशनचे प्रभारी दिग्पाल सिंह यांनी सांगितले की, सीकरमधील श्रीमाधोपूर येथील रहिवासी असलेली ही तरुणी पाकिस्तानला जाण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांशिवाय शुक्रवारी जयपूर विमानतळावर पोहोचली. इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी विमानतळावर आल्याचे मुलीने चौकशीदरम्यान सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT