Pune Crime : जबरी चोरी करणारे तिघे जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोबाईल पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असताना त्या ठिकाणी एक पांढ-या रंगाची ओमनी कार येऊन त्यातील...
Pune Crime
Pune CrimeSakal

राजेश कणसे

Pune Crime : फाउंटन हॉटेलच्या समोरील नाशिक पुणे हायवे रोडच्या आळेखिंड मध्ये रस्त्याचे कडेला थांबुन पाऊस आल्याने आपला मोबाईल पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असताना त्या ठिकाणी एक पांढ-या रंगाची ओमनी कार येऊन त्यातील दोघेजण खाली उतरून त्यातील एकाने फिर्यादीचे पॅन्टचे खिशातील मोबाईल हा जबरदस्तीने काढून घेतला.

त्यातील एक जण फिर्यादीची मोटरसायकल जबरदस्तीने ओढत असल्याने फिर्यादी हे आरडाओरड करत फाउंटन हॉटेलकडे गेल्याने ते दोघे ओमनी कार मध्ये बसून फिर्यादीचा मोबाईल घेऊन पुणे बाजूकडे निघून गेल्यानतर याबाबत ची फिर्याद सानप यांणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

Pune Crime
Pune : खडकवासला प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा; धरणाची पातळी कमी होत असल्याने..

याबाबतचा तपास पोलीसांणी सुरु केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे आदेशाने एलसीबी चे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे

Pune Crime
Mumbai Crime News: कोण आहे गँगस्टर छोटा शकीलचा शूटर?, २५ वर्षांनंतर ठाण्यात अटक

१) प्रशांत अण्णासाहेब जाधव वय २३ वर्षे, रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर याने त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती मिळाल्याने त्यास नारायणगाव परिसरातून ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता.

सदरचा गुन्हा त्याने त्याचे अन्य साथीदार सचिन पवार व शिवतेज नेहे दोन्ही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर यांचे मदतीने केल्याची कबुली दिल्याने या दोघांणा आळेफाटा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता संशयित आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला रियल मी कंपनीचा ७ प्रो मॉडेलचा मोबाईल फोन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी नंबर एम एच १५, जीएफ ७२८८ ताब्यात घेऊन त्यांणा अटक करण्यात आली आहे.

Pune Crime
Solapur Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना आजोबांने केला नातीवर अत्याचार

ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगूजर,पोलीस उप निरीक्षक अभिजित सावंत , दिपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com