viral photo sakal
देश

'20 रुपयांच्या चहावर 50 रुपयांचा टॅक्स', IRCTC चा टॅक्स इनव्हॉइस व्हायरल

आयआरसीटीसीचे एक टॅक्स इनव्हॉइस व्हायरल होत आहे,

सकाळ डिजिटल टीम

सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत आहे अशात नको त्या ठिकाणी नको त्या गोष्टीवर अवाजवी करही वाढल्याचे प्रकरण दिसत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तर हे प्रमाण अधिक वाढल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत अशातच केंद्र सरकारने अवाजवी करवर लगाम लावण्यासाठी कडक निर्देश जारी केले आहेत.

सध्या एक प्रकरण समोर आलंय.आयआरसीटीसीचे एक टॅक्स इनव्हॉइस व्हायरल होत आहे,ज्यामध्ये २० रुपयांच्या चहावर ५० रुपये सर्व्हिस चार्ज आकारल्याचं दिसतंय.सध्या या व्हायरल टॅक्स इनव्हॉइसच्या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे.

या इनव्हॉइस फोटोत दिसतेय की त्यांनी 1 चहाची किंमत 20 रुपये आहे, त्यावर 50 रुपये 'सर्व्हिस चार्ज' घेण्यात आला आहे.हे बील 28 जून 2022 चे आहे जे भोपाळ शताब्दी ट्रेनचे आहे यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहे.सोबतच वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आलेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजधानी किंवा शताब्दी सारख्या ट्रेनमध्ये रिझर्वेशन करताना प्रवासी जेवण बुक करत नाही, तर त्यांना प्रवासादरम्यान चहा, कॉफी किंवा जेवण ऑर्डर करतात त्यासाठी त्यांना 50 रुपये सर्व्हिस चार्ज भरावे लागतात. जर तुम्ही ट्रेनमध्ये 300 रुपयांमध्ये जेवण ऑर्डर केले असेल तरी तुम्हाला 350 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर २० रुपयाचा चहा मागवला तरी ५० रुपये सर्विस चार्ज भरावे लागणार. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भातील आदेश रेल्वे बोर्डाने 2018 मध्येही जारी केले होता.

या प्रकरणावर शेकडो यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात. या पोस्टवर बहुतांश युजर्सनी टॅक्स आणि सर्व्हिस चार्जमध्ये फरक असल्याचे सांगितले तर अनेक यूजर्सनी रेल्वेमंत्र्यांना या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. याशिवाय काही यूजर्सनी सर्व्हिस टॅक्स टाळण्याचे आश्चर्यकारक मार्गही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT