jessica lal murder convict manu sharma released from tihar jail  
देश

जेसिका लाल हत्याकांडातील दोषीची तिहार जेलमधून सुटका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, 02 जुन : मॉडेल जेसिका लालच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मनु शर्मा याची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. दिल्लीच्या शिक्षा समीक्षा बोर्डाने जेसिका लाल हत्याकांड प्रकऱणातील दोषी मनु शर्माच्या सुटकेसाठी शिफारस केली होती. यासाठी त्याचं नाव बोर्डासमोर सहावेळा आलं होतं. यावेळी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं.

मनु शर्मा याच्यासह दिल्लीच्या तिहार जेलमधून इतर 18 कैद्यांची सुटका सोमवारी करण्यात आली. मनु शर्मा हा माजी केंद्रीय मंत्री विनोद शर्मा यांचा मुलगा आहे.
 

मनु शर्माने ​30 एप्रिल 1999 रोजी एका पार्टीत ड्रिंक आणून देण्यास नकार देणाऱी मॉडेल जेसिका लाल हिची हत्या केली होती. त्यानंतर मनु शर्माला जन्मठेपेटी शिक्षा सुनावण्यात आली होती. 

तिसरा विवाह करून आल्याचे पत्नीने पाहिले अन्...

दरम्यान, 2018 मध्ये जेसिका लालची लहान बहिण सबरीना लाल हिने म्हटलं होतं की, त्यांनी मनु शर्माला माफ केलं आहे. आता त्याला सोडलं तरी कसलाच आक्षेप नाही. सबरीना म्हणाली होती की, मला विश्वास आहे की तो जेलमध्ये चांगलं काम करत आहे. 1999 पासून हा लढा लढत आहे आणि आता राग कमी करायला हवा. मनू शर्माने तुरुंगात 17 वर्षे काढली आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT