तिसरा विवाह करून आल्याचे पत्नीने पाहिले अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 2 June 2020

एका डॉक्टरने तिसरा विवाह केला. यामुळे चिडलेल्या दुसऱया पत्नीने बदला घेण्याचे ठरवले आणि त्याच्या अंगावर गरम पाणी ओतले. यामध्ये नवरा 45 टक्के भाजला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

इस्लामाबाद (पाकिस्तान) : एका डॉक्टरने तिसरा विवाह केला. यामुळे चिडलेल्या दुसऱया पत्नीने बदला घेण्याचे ठरवले आणि त्याच्या अंगावर गरम पाणी ओतले. यामध्ये नवरा 45 टक्के भाजला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दारूड्याने नशेत काय प्रताप केला पाहा...

डॉक्टर अब्दुल रशीद असे तिसरा विवाह करणाऱया पतीचे नाव आहे. तो पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात राहतो. पण, त्याला तिसरा विवाह महागात पडला आहे. त्याने तिसरा विवाह केल्याचे समजताच दुसऱया पत्नीने बदला घेतला. यामुळे याबाबतची चर्चा प्रांतात रंगली आहे. नवऱयाच्या अंगावर गरम पाणी ओतल्यामुळे महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...म्हणून नर्सने पाजलं नवजात बाळाला दूध

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुजफ्फरगढ शहरातील डॉक्टर अब्दुल रशीद यांनी तिसरा विवाह केल्याचे समजल्यानंतर दुसऱ्या पत्नीनं रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला. 45 टक्के भाजलेल्या डॉक्टरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आणि सोडून दिले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, दुसरा, तिसरा विवाह करणाऱया नवऱयांविरोधात यापूर्वीही येथे धक्कादायक घटना घडल्या आहेत. पहिल्या पत्नींनी अशा नवऱयांविरोधात चिडून विविध प्रकारची कृत्ये केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband suffered for 3rd marrige secound wife took revenge at pakistan