Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: लपविलेल्या कागदपत्रावर दिला निकाल; केजरीवाल यांच्या वकिलाने CJI DY चंद्रचूड यांना पाठवला ईमेल

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे.

Sandip Kapde

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसात कोर्टाने बॅक टू बॅक झटके दिले आहेत. मंगळवारी उच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली. तर बुधवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांची आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची याचिका फेटाळली.

त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवालांचे वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी भारताचे सरन्यायाधीश डिवाय चंद्रचूड यांना ईमेल पाठवला आहे.

लाईव्ह लॉने याबाबत वृत्त दिले आहे. मी भारताच्या सरन्यायाधीशांना या प्रकरणाची त्वरित यादी करण्यासाठी ईमेल पाठवला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा आमच्यापासून लपवून ठेवलेल्या अविश्वसनीय दस्तऐवजावर आधारित असल्याचे डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्या मेलला उत्तर दिले आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेवून कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ईडीने 21 मार्च रोजी शोध मोहिमेनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. सध्या तो तिहार तुरुंग क्रमांक दोनमध्ये बंद आहे. न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT