Viral Video Sakal
देश

Viral Video : चिमुकलीचं सुमधूर गायन, वादन ऐकून भारावून जाल; PM मोदींनीही शेअर केला व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लहान मुलीचा व्हिडिओ शेअर केला असून तिचे गायन आणि वादन ऐकून तुम्हालाही समाधान वाटेल. या व्हिडिओतील चिमुलकलीचे गायन अनेक नेटकऱ्यांना आवडलं असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, व्हिडिओतील चिमुकली तिच्या आईसोबत कन्नड भाषेतील एक कवितेचे गायन करत आहे. प्रसिद्ध कवी के. एस. नृसिंह स्वामी यांनी ही कविता लिहिली असून पल्लवागाला पल्लवीयाली असं या कवितेचं नाव असून हे गाणे दक्षिणेतील प्रसिद्ध गाणे असल्याचं बोललं जातंय.

पंतप्रधान मोदींनाही या चिमुकलीच्या गायनाची भुरळ पडली असून त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणेल असं यामध्ये लिहिलं आहे. शाल्मली असं या चिमुकलीचं नाव असून पंतप्रधान मोदींनी तिच्या गायनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT