Karnataka Election Result Congress Prakash Hukkeri esakal
देश

Loksabha Election : जोल्लेंनी हॅट्‌ट्रिक साधली, पण नवऱ्याचं वाढलं टेन्शन; प्रकाश हुक्केरींनी केली मोठी घोषणा!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव फिका पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण वर्षभरात विविध निवडणुका जिंकल्या आहेत.

चिक्कोडी : आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी आपण सज्ज होणार असून, आजपासूनच गावोगावी फिरणार असल्याची माहिती शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkeri) यांनी दिली. चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) उमेदवार गणेश हुक्केरी (Ganesh Hukkeri) यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत होते.

बेळगाव येथील आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी शेवटच्या टप्प्यात असताना प्रकाश हुक्केरी व गणेश हुक्केरी यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाले. तेथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर हुक्केरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव फिका पडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही त्यांचा प्रभाव चालणार नाही.

आजपासूनच मी प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांचे आभार मानणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत चिक्कोडीची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वर्षभर जोमाने तयारीला लागणार असल्याचे सांगितले. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण वर्षभरात विविध निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूकही कार्यकर्त्यांच्या हिमतीवरच लढणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही तयारीला लागण्याचे आवाहन केले. मागील लोकसभा निवडणुकीत निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांचे पती आण्णासाहेब जोल्ले यांनी प्रकाश हुक्केरींचा पराभव करत खासदारकी मिळवली होती. आता 2024 ला हुक्केरी जोल्लेंना पुन्हा आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT