kedarnath yatra halted amid continuous rain and orange alert  
देश

पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवली, ऑरेंज अलर्ट जारी

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. रुद्रप्रयागचे सीओ प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सतत पाऊस पडत आहे आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. त्यामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली असून भाविकांना हॉटेलमध्ये परतण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर यात्रा तात्पुरती थांबवली, तसेच पायी दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबवून हॉटेलमध्ये परत जाण्यास सांगितले. सुरक्षेसाठी मंदिरात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे.

मंगळवारीही परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे गुप्तकाशीमध्ये सुमारे पाच हजार लोकांना थांबवण्यात आले असून त्यांना पुढे जाऊ दिले जात नाहीये. दरम्यान, परिसरात खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवाही बंद करण्यात आली आहे. याशिवाय केदारनाथ धामच्या आजूबाजूच्या डोंगरांवर बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात पारा घसरला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सुरू झालेल्या हिमवृष्टीनंतर या भागात थंडी वाढली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या टेकड्या बर्फाने झाकल्या गेल्या आहेत. कडाक्याची थंडी असूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर चार धामांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे 6 मे रोजी उघडण्यात आले. पुढील 6 महिने ही यात्रा सुरू राहणार आहे. तत्पूर्वी, केदारनाथला मोठ्या संख्येने यात्रेकरू आल्याने संपूर्ण परिसर कचऱ्याने माखल्याची बातमी समोर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा पुन्हा दणका! थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; राज्यभर कारवायांचा धडाका

Commonwealth Games 2026: जय हो! राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचं पदक पक्कं झालं; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : 'युवकांच्या भविष्यासाठी राजकारण नको; चर्चेत अडथळे आणू नका', सर्व पक्षांना किरेन रिजिजू यांचे आवाहन

Solapur News: मंगळवेढ्यात वंचित बहुजन आघाडीचा बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध

IND vs ZIM 1st T20I : पहिल्या सामन्यापूर्वीच धक्का, फलंदाजाची दुखापतीमुळे माघार, बोर्डाने जाहीर केली रिप्लेसमेंट... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT