हे तर 'जुम्मे के जुम्मे' सरकार, रावसाहेब दानवेंचा 'मविआ'ला टोला

raosaheb danve slams mva govt over water crisis in aurangabad in bjp jal aakrosh morcha rak94
raosaheb danve slams mva govt over water crisis in aurangabad in bjp jal aakrosh morcha rak94

औरंगाबाद : आज शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर भाजप(BJP) कडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट ते क्रांती चौक दरम्यान हा मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाली होते. या मोर्चानंतर भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर पाणीप्रश्नावरून जोरदार टीका केलीय, या राज्य सरकारचं नाव महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) नसून, जुम्मे के जुम्मे सरकार आहे, असे दानवे (Raosaheb Danve) म्हणालेत. (Raosaheb Danve On MVA Govt)

दानवे म्हणाले की, शहरात पाणी सात ते आठ दिवसाला म्हणजे जुम्मा ते जुम्मा मिळतं त्यामुळे आपण सरकारचं नामांतर करून टाकू, या सरकरला उद्यापासून महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही, तर 'जुम्मे के जुम्मे'चं सरकार म्हणायचं. हे सरकार अमर-अकबर-अँथोनीचं सरकार सरकार आहे. यांच्यामध्ये कधीही नेते एकत्र बसत नाहीत, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

raosaheb danve slams mva govt over water crisis in aurangabad in bjp jal aakrosh morcha rak94
औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून बॅनर्सची फाडाफाडी

भाजप-शिवसेनेची सत्ता होती पण आमची मतं चोरीला गेली, पण आता चोर सापडला आहे. त्यामुळं सप्टेबर-ऑक्टोबरमध्ये या चोराला शिक्षा द्यायची आहे असे देखील दानवे यावेळी म्हणाले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगायची गरज नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना १६०८० कोटी रूपयांची योजना मंजूर केली. पण सत्ता बदलली आणि योजना रखडली. जेव्हा मुख्यमंत्री घरात होते, फडणवीस तुमच्या दारात होते. त्यांनतर मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले. दोन मंत्री जेलमध्ये आणि मुख्यमंत्री घरात असे हे सरकार आहे, अशी टीका देखील रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकरवर केली आहे.

raosaheb danve slams mva govt over water crisis in aurangabad in bjp jal aakrosh morcha rak94
औरंगाबाद महापालिका भ्रष्टाचाराचा महाअड्डा : फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com